Happy Bhai Dooj 2021 | या दिवाळीला भाऊ तुमच्यापासून लांब आहे?, भाऊबीजेला भावाला द्या व्हर्च्युअल शुभेच्छा

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे.

Happy Bhai Dooj 2021 | या दिवाळीला भाऊ तुमच्यापासून लांब आहे?, भाऊबीजेला भावाला द्या व्हर्च्युअल शुभेच्छा
Happy-Bhai-Dooj
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 8:19 AM

मुंबई : कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या वर्षी भाऊबीज शनिवार, ६ नोव्हेंबर २०२१ रोजी येणार आहे. या भाऊबीजेला तुमच्या भावाला खास मराठी मधून शुभेच्छा द्या.

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

“जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा”

“बंध भावनांचे
बंध अतूट विश्वासाचे
नाते भाऊ-बहिणीचे…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा”

“दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि
भाऊबीजेला आस असते भाऊबहीणींना एकमेकांच्या भेटीची.
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा”

“सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा”

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे.
म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं
खूप खूप गोड आहे❤️
भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

 

इतर बातम्या : 

PHOTO | Chanakya Niti : जीवनाशी संबंधित आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या याबाबत

Chitragupta Puja 2021 | भाऊबीजेला होणार कर्माचा हिशेब ठेवणाऱ्या भगवान चित्रगुप्ताची पूजा, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा का, जाणून घ्या

Bhai Dooj 2021 : भाऊबीजेचा सण का साजरा करतात, जाणून घ्या पौराणिक कथा आणि शुभ मुहूर्त