Chitragupta Puja 2021 | भाऊबीजेला होणार कर्माचा हिशेब ठेवणाऱ्या भगवान चित्रगुप्ताची पूजा, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा का, जाणून घ्या

जेव्हा एखाद्या प्राण्याचे आयुष्य संपते, तेव्हा यमलोकात जाताना भगवान चित्रगुप्त त्याच्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्यासमोर ठेवतात आणि त्यानुसार तो स्वर्गात जाणार की नरकात जाणार हे ठरते. मान्यता आहे की भगवान चित्रगुप्त पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे कर्मांचा हिशेब लिहून ठेवतात.

Chitragupta Puja 2021 | भाऊबीजेला होणार कर्माचा हिशेब ठेवणाऱ्या भगवान चित्रगुप्ताची पूजा, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा का, जाणून घ्या
chitragupta

मुंबई : जो पृथ्वीवर जन्म घेतो, त्याचा मृत्यू निश्चित असतो. कारण, हा ईश्वराने निर्माण केलेला सृष्टीचा नियम आहे. सामान्य माणूस असू दे की स्वतः देव, कोणाही मृत्यूपासून वाचू शकत नाही. त्याला या ना त्या कारणाने शरीर सोडून परलोकात जावेच लागले. भगवान राम-कृष्णापासून ते सर्व दैवी आत्म्यांना ठराविक वेळी पृथ्वीवर आपले शरीर सोडावे लागले आहे.

मान्यता आहे की, जेव्हा एखाद्या प्राण्याचे आयुष्य संपते, तेव्हा यमलोकात जाताना भगवान चित्रगुप्त त्याच्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्यासमोर ठेवतात आणि त्यानुसार तो स्वर्गात जाणार की नरकात जाणार हे ठरते. मान्यता आहे की भगवान चित्रगुप्त पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे कर्मांचा हिशेब लिहून ठेवतात.

कोण आहेत भगवान चित्रगुप्त?

भगवान चित्रगुप्त यांचा जन्म परमपिता ब्रह्मदेवाच्या अंशातून झाला. मान्यता आहे की जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मितीं केली आणि देव-असुर, गंधर्व, अप्सरा, स्त्री-पुरुष, पशु-पक्षी इत्यादींना जन्म दिला. त्याच क्रमाने यमराजाचाही जन्म झाला. ज्यांना धर्मराज म्हणतात, कारण ते धर्माप्रमाणे प्राण्याला त्याच्या कर्माचे फळ देतात.

या मोठ्या कार्यासाठी यमराजांनी ब्रह्माजींकडे सहयोगी मागितला तेव्हा ब्रह्माजी ध्यानस्थ झाले आणि हजार वर्षांच्या तपश्चर्येनंतर एका पुरुषाचा जन्म झाला. ज्यांना आपण भगवान चंद्रगुप्त म्हणून ओळखतो. यांचा जन्म ब्रह्माजींच्या कायेतून झाला होता म्हणून त्यांना कायस्थ असेही म्हणतात. यमद्वितीयेच्या दिवशी यम आणि यमुना यांच्या पूजेबरोबरच भगवान चित्रगुप्ताची विशेष पूजा केली जाते. कारण, भगवान चित्रगुप्त हे यमराज यांचे सहाय्यक आहेत.

भगवान चित्रगुप्ताच्या पूजेचे महत्त्व

व्यवसायाशी निगडित लोकांसाठी चित्रगुप्तांच्या पूजेचं खूप महत्त्व आहे. या दिवशी नवीन वहीखात्यांवर ‘श्री’ लिहून काम सुरु केले जाते. यामागे अशी धारणा आहे की व्यापारी आपल्या व्यवसायाशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाचा तपशील भगवान चित्रगुप्तजींसमोर ठेवतात आणि त्यांच्याकडे व्यवसायात आर्थिक प्रगतीसाठी आशीर्वाद मागतात. भगवान चित्रगुप्ताच्या पूजेत लेखणी-शाई याला फार महत्त्व आहे.

चित्रगुप्त देवाची पूजा कशी कराल?

भगवान चित्रगुप्त आणि यमराज यांची मूर्ती किंवा चित्र ठेवून त्यांची फुले, अक्षत, कुंकू, नैवेद्य वगैरे अर्पण करुन भक्तिभावाने त्यांची पूजा करावी. यानंतर एका साध्या कागदावर कुंकू तुपाच्या साहाय्याने स्वतिकची खूण काढावी. त्यानंतर पाच देवतांची नावे लिहावी.

त्यासोबतच,मषीभाजन संयुक्तश्चरसित्वं! महीतले. लेखनी- कटिनीहस्त चित्रगुप्त नमोऽस्तुते. चित्रगुप्त! नमस्तुभ्यं लेखकाक्षरदायकम्. कायस्थजातिमासाद्य चित्रगुप्त! नमोऽस्तुते, हा मंत्र देखील लिहावा. त्यानंतर तुमचे नाव, कायमचा आणि सध्याचा पत्ता, हिंदी महिन्याची तारीख, वर्षभराचे उत्पन्न आणि खर्च लिहून कागदाची घडी करुन देवाच्या चरणी अर्पण करा. देवाने तुमचे धन आणि वंश आणखी वाढावावा, अशी ईच्छा प्रगट करावी. भगवान चित्रगुप्ताची श्रद्धेने आणि भक्तीभावाने पूजा करावी.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhai Dooj 2021 | बहीण-भावाच्या नात्याचा मोठा उत्सव, जाणून घ्या भाऊबीजेबद्दल

PHOTO | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कालभैरव देवाचा अग्नीचा भेंडोळी उत्सव, पाहा खास फोटो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI