AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budh Gochar 2024: 22 ऑगस्टनंतर या 3 राशींवर गणेशाची होईल कृपा, बक्कळ नफा

Budh Gochar 2024: ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाला महत्त्व आहे. ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक आहे. त्यामुळे तो जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव इतर राशींवर देखील होतो. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार याचा मोठा फायदा.

Budh Gochar 2024: 22 ऑगस्टनंतर या 3 राशींवर गणेशाची होईल कृपा, बक्कळ नफा
| Updated on: Aug 06, 2024 | 8:26 PM
Share

Budh Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह 22 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या गोचरमुळे तीन राशींवर परिणाम होणार आहे. यापैकी 3 राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होईल. या राशींवर गणेशाची विशेष कृपा असेल. भगवान बुध 14 दिवस कर्क राशीत राहतील. कोणत्या आहेत त्या 3 राशीं. जाणून घेऊयात. सध्या बुध ग्रह सिंह राशीत असून तो आता प्रतिगामी वाटचाल करत आहे. भगवान बुध 22 ऑगस्ट रोजी प्रतिगामी होईल आणि आपली राशी बदलणार आहे. या दिवशी सकाळी 06.22 वाजता बुध कर्क राशीत प्रवेश करेल. 29 ऑगस्ट रोजी कर्क राशीत मार्गक्रमन करताना बुध यानंतर ४ सप्टेंबरला बुध मघा नक्षत्रात प्रवेश करेल. या दिवशी बुध देखील आपली राशी बदलेल. 04 सप्टेंबर रोजी बुध ग्रह थेट कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल.

मिथुन

ग्रहांचा राजकुमार बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे. या राशीची देवता गणेश आहे. राशी परिवर्तनाच्या काळात मिथुन राशीवर बुध ग्रहाचा विशेष कृपा वर्षाव होईल. गणेशाच्या कृपेने व्यवसायात तेजी दिसून येईल. बुध हा व्यवसायाचा दाता आहे. कुंडलीत जर बुध हा बलवान असेल तर व्यक्ती मृदुभाषी असते. यामुळे मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. याशिवाय उत्पन्न ही वाढेल. श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दर बुधवारी त्याला दुर्वा, मोदक आणि लाडू अर्पण करावेत. हा उपाय केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

तूळ

तूळ राशीच्या लोकांनाही कर्क राशीत बुधाच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. करिअरच्या घरात बुध ग्रहाची उपस्थिती असेल. यामुळे तूळ राशीच्या लोकांचं करिअर चांगलं राहिल. नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य राहील. गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ मिळेल. बुध ग्रहाचा आशीर्वाद अलेल तर प्रत्येक कामात यश मिळेल. तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. मित्रांकडून आर्थिक मदत होऊ शकते. व्यवसायात मोठी कमाई करू शकता. यामुळे भविष्यात फायदा होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांना देखील बुध गोचरचा फायदाच होणार आहे. या राशीतील लोकांना व्यवसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमतेमुळे अनेक कामांना यश मिळेल. सहकाऱ्याकडून मार्गदर्शन मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून खास मदत होईल. बुध गोचरमुळे आर्थिक स्थितीही सुधार होईल. मेहनात घ्याल तर व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.