उद्या बुध करणार विशाखा नक्षत्रात प्रवेश, या 6 राशींचे अच्छे दिन सुरू, नोकरी-व्यवसायात होणार लाभ

बुध २५ नोव्हेंबरपासून विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार असून ज्योतिषशास्त्रानुसार याचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. या नक्षत्र परिवर्तनामुळे ६ राशींच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकतो, जाणून घ्या.

उद्या बुध करणार विशाखा नक्षत्रात प्रवेश, या 6 राशींचे अच्छे दिन सुरू, नोकरी-व्यवसायात होणार लाभ
budh nakshatra Parivartan
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Nov 24, 2026 | 7:42 PM

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, संवाद आणि व्यापाराचा कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या स्थितीत होणाऱ्या बदलांचा परिणाम व्यक्तीच्या करिअरपासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंत दिसून येऊ शकतो, असे मानले जाते. आता २५ नोव्हेंबर रोजी बुध विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी गुरु असल्याने बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांचा प्रभाव काही राशींवर पडू शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार, या संक्रमणामुळे सहा राशींसाठी प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घेऊया.

धनु
बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणी हळूहळू कमी होतील. व्यावसायिकांना कामात चांगल्या संधी मिळू शकतात, तसेच व्यवसायातून नफा होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न करू शकता.

Loading...

मिथुन
करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. मित्रांकडूनही योग्य वेळी मदत मिळू शकते. या काळात नशिबाची साथ मिळाल्याने महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा आत्मविश्वास वाढू शकतो.

मकर
हा काळ कौटुंबिक आणि आर्थिक दृष्टीने सकारात्मक ठरेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहिल.

कन्या
व्यवसायात येणाऱ्या अडचणी कमी होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन ऑफर मिळण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो.

वृषभ
घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहिल. कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. मात्र, बोलताना शब्दांचा विचार करणे आवश्यक ठरेल. तुमच्या बोलण्यामुळे एखादा गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या.

मीन
करिअरशी संबंधित निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. घाईने कोणताही निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीचा नीट विचार करणे योग्य ठरेल. या काळात जोडीदाराची साथ आणि सहकार्य मिळू शकते. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मकता टिकून राहण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us