Durga Chalisha: चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये ‘या’ पाठाचे पठण करणे ठरेल फायदेशीर

chaitra navratri 2025: चैत्र नवरात्रात, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि उपवास पाळला जातो. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीत देवीची पूजा करणाऱ्या आणि उपवास करणाऱ्यांच्या जीवनात आनंद कायम राहतो. तसेच, सर्व त्रास दूर होतात.

Durga Chalisha: चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये या पाठाचे पठण करणे ठरेल फायदेशीर
chaitra navratri
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2025 | 4:16 PM

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केले जातात. प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. सणाच्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुम्हाला त्यांचे आशिर्वाद प्राप्त होते. चैत्र नवरात्र हिंदू धर्मात खूप खास मानली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस खूप पवित्र असतात. या नऊ दिवसांत, भक्त दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात आणि उपवास करतात. नवरात्रीच्या दिवसांत, पूजा करताना दररोज दुर्गा चालीसा वाचली पाहिजे. नवरात्रीच्या दिवसांत, माता राणीच्या उपवास आणि पूजेदरम्यान दररोज दुर्गा चालीसा पठण करणाऱ्या व्यक्तीवर देवी प्रसन्न होते. दुर्गा चालीसा पठण करणाऱ्यांचे प्रलंबित काम पूर्ण होते. तुम्हाला त्रासांपासून मुक्तता मिळते. आयुष्यात नेहमीच यश मिळते.

या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये चैत्र नवरात्र उद्यापासून म्हणजेच 30 मार्चपासून सुरू होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा आज दुपारी 4:27 वाजता सुरू झाली आहे आणि 30 मार्च रोजी म्हणजे दुपारी 12:49 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदयतिथीनुसार, उद्यापासून नवरात्रीचे व्रत पाळले जाईल. चैत्र नवरात्र 6 एप्रिल रोजी संपेल. चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करू शकतात.

॥दुर्गा चालीसा॥
नमो नमो दुर्गे सुख करनी। नमो नमो अंबे दुःख हरनी॥
निरंकार है ज्योति तुम्हारी। तिहूं लोक फैली उजियारी॥
शशि ललाट मुख महाविशाला। नेत्र लाल भृकुटि विकराला॥
रूप मातु को अधिक सुहावे। दरश करत जन अति सुख पावे॥
अन्नपूर्णा हुई जग पाला। तुम ही आदि सुन्दरी बाला॥
प्रलयकाल सब नाशन हारी। तुम गौरी शिवशंकर प्यारी॥
शिव योगी तुम्हरे गुण गावें। ब्रह्मा विष्णु तुम्हें नित ध्यावें॥
धरयो रूप नरसिंह को अम्बा। परगट भई फाड़कर खम्बा॥
रक्षा करि प्रह्लाद बचायो। हिरण्याक्ष को स्वर्ग पठायो॥
लक्ष्मी रूप धरो जग माहीं। श्री नारायण अंग समाहीं॥
हिंगलाज में तुम्हीं भवानी। महिमा अमित न जात बखानी॥
मातंगी अरु धूमावति माता। भुवनेश्वरी बगला सुख दाता॥
श्री भैरव तारा जग तारिणी। छिन्न भाल भव दुःख निवारिणी॥
कर में खप्पर खड्ग विराजै। जाको देख काल डर भाजै॥
सोहै अस्त्र और त्रिशूला। जाते उठत शत्रु हिय शूला॥
नगरकोट में तुम्हीं विराजत। तिहुँलोक में डंका बाजत॥
महिषासुर नृप अति अभिमानी। जेहि अघ भार मही अकुलानी॥
रूप कराल कालिका धारा। सेन सहित तुम तिहि संहारा॥
परी गाढ़ सन्तन पर जब जब। भई सहाय मातु तुम तब तब॥
ज्वाला में है ज्योति तुम्हारी। तुम्हें सदा पूजें नर-नारी॥
प्रेम भक्ति से जो यश गावें। दुःख दारिद्र निकट नहिं आवें॥
ध्यावे तुम्हें जो नर मन लाई। जन्म-मरण ताकौ छुटि जाई॥
शंकर अचरज तप कीनो। काम क्रोध जीति सब लीनो॥
निशिदिन ध्यान धरो शंकर को। काहु काल नहिं सुमिरो तुमको॥
शक्ति रूप का मरम न पायो। शक्ति गई तब मन पछितायो॥
भई प्रसन्न आदि जगदम्बा। दई शक्ति नहिं कीन विलम्बा॥
मोको मातु कष्ट अति घेरो। तुम बिन कौन हरै दुःख मेरो॥
आशा तृष्णा निपट सतावें। रिपु मुरख मोही डरपावे॥
करो कृपा हे मातु दयाला। ऋद्धि-सिद्धि दै करहु निहाला।
जब लगि जियऊं दया फल पाऊं। तुम्हरो यश मैं सदा सुनाऊं॥
श्री दुर्गा चालीसा जो कोई गावै। सब सुख भोग परमपद पावै॥
॥ इति श्री दुर्गा चालीसा सम्पूर्ण ॥

चैत्र नवरात्रीचे महत्त्व…
चैत्र नवरात्री वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये येते, त्यामुळे ती नवीन सुरुवात आणि नविन आशा देणारी मानली जाते. या काळात देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्यामुळे उपासकांना शक्ती, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. नवरात्रीचे व्रत आणि पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि नकारात्मक भावना कमी होतात. या काळात सकारात्मकता वाढते आणि वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय होतो, असा विश्वास आहे. चैत्र महिना हा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आणि शेतीसाठी महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे या काळात शेती आणि उत्पन्नासाठी प्रार्थना केली जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)