
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितला आहे. चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही तेवढेच उपयोगी आहेत. माणसानं आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये, याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांच्या मते प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, मात्र त्यापूर्वी किंवा त्यानंतर तुम्ही जर निर्णय घेतला तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
जेव्हा तुम्ही दु:खी असता तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही दु:खी असतात तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका. संयम ठेवा कारण अनेकदा असं होतं की तुम्ही दु:खी असता, जेव्हा तुम्ही दु:खी असता तेव्हा तुम्ही सारासार विचार करण्याची शक्ती हरवून बसलेले असतात, त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्ही चुकीचाच निर्णय घेण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्ही दु:खी असता तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका, संयम ठेवा, कारण अशा निर्णयामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.
जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा कोणालाही आश्वासन देऊ नका – चाणक्य म्हणतात जंस माणूस दु:खात आपली विचार करण्याची शक्ती हरवून बसतो, तसंच आनंदाचं देखील आहे, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही फार काही विचार करत नाही, या काळात जर कोणी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आले तर तुम्ही ते त्याला लगेच देऊन टकता, त्यामुळे पुढे तुम्ही अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा कोणालाही कोणतंही आश्वासन देऊ नका, यातच तुमचं हीत आहे.
रागात असताना कोणालाही उत्तर देऊ नका – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा रागात असतात तेव्हा कोणालाही उत्तर देण्याची चूक करू नका, अशा परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जाण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे तुम्ही जेव्हा रागात असतात तेव्हा मौन ठेवा त्यातच तुमचं हीत आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)