Chanakya Neeti : चाणक्य म्हणतात या पाच गोष्टींना कधीच घाबरू नका, यश तुमचंच

आर्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याला तुम्ही कधीच घाबरू नका असा सल्ला ते देतात. जर तुम्ही या गोष्टींना घाबरला नाहीत, त्याचा सामना केला तर तुम्हाला यश नक्की मिळणार असं त्यांनी म्हटलं आहे.

Chanakya Neeti : चाणक्य म्हणतात या पाच गोष्टींना कधीच घाबरू नका, यश तुमचंच
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2025 | 9:34 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यानी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये मानसाची एक आदर्श जीवनपद्धती कशी असावी याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे, त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मानवाला आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला अडचणी येत असतात, मात्र या अडचणीपासून तुम्ही कधीही दूर जाऊ नका, त्यांचा संयमानं सामना करा तुम्हाला यश नक्की मिळणार. आर्य चाणक्य यांनी अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टींना तुम्ही जर घाबरला नाहीत तर यश तुम्हाला नक्की मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे ते?

निर्यण घ्यायला घाबरू नका – चाणक्य म्हणतात अनेकदा तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की तिथे तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, मात्र असे निर्णय घेत असताना घाबरू नका, निर्णय घ्या, तो चुकला तर चुकू द्या, पण निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल.

संकटाच्या काळात दुसऱ्याचा सल्ला घेऊ नका – चाणक्य म्हणतात तुमच्यावर जेव्हा संकट असतं तेव्हा दुसऱ्याचा सल्ला घेऊ नका, तुमच्या मनाचं ऐका तुम्हाला जे वाटेल ते करा.

नुकसानाला भीऊ नका – चाणक्य म्हणतात आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतता जिथे तुमचं नुकसान होऊ शकतं, मात्र नुकसानाला घाबरू नका, तुम्ही तुमचं कार्य सुरू ठेवा, यश तुम्हाला मिळेल.

कष्टाला घाबरू नका – आर्य चाणक्य म्हणतात कष्टाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे कष्टाला कधीही घबरू नका, यश तुमचंच आहे.

निंदेला घाबरू नका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही पुढं जात असतात तेव्हा तुमची निंदा करणारे किंवा तुम्हाला मागे ओढणारे वाटेत अनेक भेटतील, मात्र तुम्ही निंदेला घाबरू नका, तुमचं मार्गक्रमण सुरूच ठेवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)