Chanakya Neeti : आयुष्यात जो या दोन गोष्टींना घाबरतो, तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आहे, आयुष्यात अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांना कधीच घाबरू नका, यश तुम्हाला नक्की मिळेल असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Neeti : आयुष्यात जो या दोन गोष्टींना घाबरतो, तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2025 | 4:54 PM

आर्य चाणक्य हे त्यांच्या काळातील एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित सर्वच क्षेत्रांसंबंधी आपले विचार मांडले आहेत. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. मानवी जीवनाशी संबंधित असं एकही क्षेत्र सापडणार नाही, त्याबद्दल चाणक्य यांनी लिहिले नसेल. चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांनी पैशांबाबत देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जसं की पैसा बचत कसा करावा? पैसा कधी खर्च करावा? किती खर्च करावा? कोणाला मदत करू नये? कोणाला मदत करावी? याबाबत चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सविस्तर सांगण्यात आलं आहे. चाणक्य म्हणतात व्यक्ती जेव्हा संकटात असतो, तेव्हा सर्वात आधी पैसाच त्याच्या कामाला येतो, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यावर संकट येणार देखील नाही, त्यामुळे प्रत्येकाने पैशांची बतच ही केलीच पाहिजे.

दरम्यान चाणक्य हे जसे अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाचे अनेक भेद सांगीतले आहेत. जसं की आपला मित्र कसा ओळखायचा? आपले शत्रू कोणं? कोणाची संगत करावी, कोणाची संगत करू नये, अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य म्हणतात की जगात अशा दोन गोष्टी आहेत, त्याला जर तुम्ही भीत असाल तर आयुष्यात तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

जीवनातील बदल – चाणक्य म्हणतात बदल हा जीवनाचा नियम आहे, आयुष्यात खूप सगळे बदल होत असतात, परिस्थितीमध्ये चढ -उतार सुरू असते, मात्र लक्षात ठेवा की परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही, ती बदलत असते, त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे बदल घडतात त्यामुळे गोंधळून जाऊ नका, घाबरू नका. तुम्हाला यश नक्की मिळेल.

संघर्ष – चाणक्य म्हणतात या जगात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही, या जगात कोणतीच वस्तू फुकट मिळत नाही, ती मिळवण्यासाठी कष्टच करावे लागतात, त्यामुळे तुम्ही जेवढा जास्त संघर्ष कराल तेवढं जास्त यश तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आयुष्यात कधीही संघर्षाला घाबरू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)