
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, मात्र सोबतच ते प्रख्यात कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी ज्या कुटनीती सांगितल्या आहेत, त्याचा उपयोग हा केवळ राज्यकारभार चालवण्यासाठीच होत नाही, तर माणसाच्या आयुष्यात आलेली संकट दूर करण्यासाठी देखील या नीती प्रभावी ठरतात. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांसाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे की, माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, की त्या गोष्टी तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असेल त्याला देखील कधीच सांगता कामा नये, अगदी आपल्या पत्नीला देखील ही गोष्ट सांगू नका, ती फक्त तुमच्यापुरतीच मर्यादीत ठेवा, कारण अशा गोष्टी तुम्ही कोणाला सांगितल्या तर त्यामुळे तुम्ही अडचणीत याला. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
कोणत्या गोष्टी सांगू नयेत – चाणक्य म्हणतात तुम्ही जर भविष्याच्या दृष्टीकोनातून एखादी योजना बनवणार असाल आणि त्यातून तुमचा जर फायदा होणार असेल, तुम्ही यशस्वी होणार असाल तर अशी योजना पूर्णत्वास जाईपर्यंत कोणालाही सांगू नका, कारण त्यामुळे अनेक जण तुमचे शत्रू तयार होऊ शकतात. तसेच या योजनेबाबत जर तुमच्या शत्रूला कळाले तर ती योजना पूर्ण होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून अनेक अडथळे त्यामध्ये आणले जातील.
आर्थिक कमजोरी – चाणक्य म्हणतात जर तुमची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, तर अशा अवस्थेमध्ये याची माहिती तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला कधीच देऊ नका, कारण जेव्हा तुमची परिस्थिती खराब असते, तेव्हा तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असू द्या, तो फक्त त्या परिस्थितीचा फायदाच उचलणार असतो, मात्र जर लोकांना असं वाटलं की तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, ते या भ्रमात जरी राहिले तर तुम्हाला जगात मान-सन्मान मिळत राहतो. त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत कोणाशीही चर्चा करू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
प्रेम प्रकरण – चाणक्य म्हणतात की जर तुमचं लग्नापूर्वी काही प्रेम प्रकरण असेल मात्र लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बायकोसोबत प्रामाणिक आहात, तर अशा परिस्थितीमध्ये जुन्या प्रेम प्रकरणाबाबत आपल्या बायकोशी कधीही चर्चा करू नका, भलेही तुमचा हेतू चांगला असेल, मात्र त्यामुळे तुमच्या बायकोच्या मनात संशय निर्माण होण्यासाठी वेळ लागत नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)