
आर्य चाणक्य हे एक भारतातील महान विद्वान आणि विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही कालबाह्य झाल्या नसून, आयुष्य जगताना मार्गदर्शन ठरतात. चाणक्य म्हणतात प्रत्येक माणूस आपल्याला समाजात आदराचं स्थान मिळावं, समाजानं आपला मान-सन्मान करावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत असतो. समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं यासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी असते, कारण प्रतिष्ठा ही सर्वांसाठीच महत्त्वाचा विषय असतो. परंतु अनेकदा असं होतं की लोक तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करतात, मात्र तुमची पाठ फिरताच तुमची निंदा केली जाते, परंतु असे देखील काही लोक असतात, ज्यांचं तोडांवर तर कौतुक होतचं,मात्र त्यांच्या पाठीमागे देखील त्यांचं कौतुक केलं जातं, कारण त्यांच्यामध्ये काही खास गुण असतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
नम्रता – चाणक्य म्हणतात नम्रता हा असा गुण आहे, त्यामुळे तुम्ही समाजाच्या आदरास पात्र ठरतात, असे खूप थोडे लोक असतात ज्यांच्याकडे सर्व गोष्टी असून देखील ते नम्र असतात, तर काही लोकांकडे फार काही नसतं मात्र तरी देखील ते नम्र नसतात. एक लक्षात ठेवा जे लोक नम्र आहेत त्यांचा समाज नेहमी आदर करतो.
पैसा – चाणक्य म्हणतात आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे, पैशामुळे तुम्ही काहीही करू शकतात. लक्षात ठेवा तुमच्याकडे जर पैसा असेल तर समाज देखील तुम्हाला मान-सन्मान देईल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला विचारात घेतलं जाईल.
ज्ञान – चाणक्य म्हणतात ज्ञान ही जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे, जगात नेहमीच ज्ञानी माणसाचा आदर केला जातो. ज्ञानी मानसाला समाजात मानाचं स्थान असतं.
वेळेचं व्यवस्थापन – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला वेळेचं योग्य व्यवस्थापन जमत, तो व्यक्ती समाजाच्या आदरास पात्र ठरतो. कारण असा व्यक्ती योग्य वेळेत योग्य कामे करतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)