
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या काही नीती सांगितल्या आहेत, त्या नीती आजही काळाच्या सुसंगत वाटतात. आयुष्य जगत असताना या नीती माणसाला मार्गदर्शन करतात. अनेकदा आपल्याला आयुष्यात असा प्रश्न पडतो की आपला खरा मित्र कोण आणि कोणी फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्याशी मैत्री केली आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकर न मिळाल्यास आपला मोठा विश्वासघात देखील होऊ शकतो. कारण आपण अनेकदा जो व्यक्ती आपल्यासोबत मैत्रीचं नाटक करत आहे, अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे आपल्याला आपला खरा मित्र कोण आणि कोण मैत्रीचं नाटक करतं? यातील फरक समजू शकतो.
मित्राची ओळख संकट काळात – चाणक्य म्हणतात तुमचा खरा मित्र कोण हे तुम्हाला फक्त तेव्हाच कळू शकतं जेव्हा तुम्ही संकटात असता. तुम्ही संकटामध्ये सापडल्यानंतर अनेक जण तुम्हाला सोडून जातील, पण जो खरा मित्र आहे, तो कधीही तुमची साथ सोडणार नाही. जो संकट काळात तुमच्यासोबत आहे, तोच तुमचा खरा मित्र आहे. अशा व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता.
वाईट गोष्टी – चाणक्य म्हणतात तुमचा जो खरा मित्र आहे, तो वाईट गोष्टींमध्ये तुमची कधीच साथ देणार नाही, भलेही त्यात त्याला कितीही फायदा दिसत असेल तरी देखील तो अशा गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, प्रसंगी त्यासाठी तो तुमच्याशी भांडण देखील करू शकतो.
टीका – चाणक्य म्हणतात तुमचा जो खरा मित्र असतो, त्याला नेहमी तुमचं चांगलं व्हावं असंच वाटत असतं, त्यामुळे तुम्ही कुठे चुकत असाल तिथे तो तुमची खोटी स्तुती कधीच करणार नाही, तो तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी स्पष्टपणे तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देईल, अशा व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)