हे 5 नियम पाळा, आयुष्यात कधीच होणार नाही अपमान, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आदर्श जीवन कसं जगावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात काही लोकांना या समजात कायम आदराचं स्थान मिळतं, तर याउलट काही लोकांचा पदोपदी अपमान होतो, असं का होतं तर याचं रहस्य त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये दडलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्या काळात चाणक्य यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी देशभरातून अनेक प्रसिद्ध व्यक्ती येत असत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या 21 व्या शतकात देखील लागू होतात. चाणक्य नीती फक्त राजा आणि राज्यकारभाराशीच संबंधित नाही, तर सामान्य माणसाशी निगडीत अनेक विषय या ग्रंथामध्ये मांडण्यात आले आहेत. चाणक्य म्हणतात समाजात काही असे लोक असतात ज्यांना आयुष्यभर चांगला मान-सन्मान मिळतो, लोक त्यांचा आदर करतात. परंतु असे देखील काही लोक असतात, त्या लोकांची संगत अनेकांना नको वाटते समाज त्यांचा अपमान करतो. असं का होतं तर तुम्हाला मान -सन्मान प्राप्त होणार आहे की, तुमचा अपमान हे तुमच्या स्वभावावर अवलंबून असतं. चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या जर आपण पाळल्या तर समाजात नक्कीच आपल्याला सन्मान मिळेल.
इतरांचा आदर करा – चाणक्य म्हणतात जगाचा नियम आहे, आदर द्या, आदर घ्या. तुम्ही जेव्हा इतरांचा आदर कराल, इतरांना सन्मापूर्वक वागणूक द्याल, तेव्हा समाजही आपोआप तुमचा आदर करेल, तुम्हाला जगात मानाचं स्थान प्राप्त होईल.
ज्ञानाचा योग्य वापर करा – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे फक्त ज्ञान असणं पुरेसं नाहीये, तर त्या ज्ञानाचा वापर तुम्हाला योग्य पद्धतीने समाजाच्या हितासाठी करता आला पाहिजे, तर तुम्हाला समाज सन्मान देईल.
जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडा – चाणक्य म्हणतात तुमच्यावर जी जबाबदारी सोपवण्यात येईल, ती योग्य पद्धतीने पार पाडा, त्यामुळे तुम्ही समाजाच्या सन्मानास पात्र व्हाल.
विनम्रता – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, कितीही ताकद असू द्या, पण तुम्ही विनम्र रहा, त्यामुळे समाजात नेहमी तुमचा आदर होईल.
रागीट स्वभाव- चाणक्य म्हणतात जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरून लगेच राग येत असेल तर ही सवय सोडून द्या, यामध्येच तुमचं हित आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
