
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना प्रेरणा देतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये एक आदर्श कुटुंब कसं असावं? या बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. कुटुंबातील नाती कशी असावीत? एकमेकांचा एक दुसऱ्याबरोबर व्यवहार कसा असावा? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? कुटुंब प्रमुखानं घर कसं संभाळावं अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
दरम्यान चाणक्य यांनी घरातील कुटुंब प्रमुखाच्या अशा काही सवई सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या सवई जर कुटुंबप्रमुखाला असतील तर त्याने वेळीच सुधारलं पाहिजे, अन्यथा संपूर्ण घर बरबाद होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्या सवई नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? हे जाणून घेऊयात.
कुटुंब प्रमुखाचा व्यवहार – चाणक्य म्हणतात कुटुंबातील प्रमुखाचा व्यवहार हा घरातील प्रत्येक सदस्यासोबत प्रेमळ असावा, काही प्रसंगी त्याने कठोर देखील व्हाव, मात्र घरातील सर्व सदस्यांना त्याने संभाळून घ्यावं, आपल्या भाऊ बहिणींसोबत त्याचा व्यवहार हा चांगला असावा, त्याने कधीही भाऊ बहिणींबद्दल मनात कपट ठेवू नये.
घरातील नियम – घर चांगलं चालावं, त्याचं संचलन उत्तम व्हाव यासाठी काही नियम आवश्यक असतात. मात्र घरांच्यासाठी जे नियम बनवले आहेत, त्या नियमांचं सर्वात आधी पालन कुटुंब प्रमुखानं करावं आणि नंतर घरातील इतर व्यक्तींना नियमांचं पालन करण्यास सांगावं, असं चाणक्य म्हणतात.
भांडण – चाणक्य म्हणतात जर तुमच्या घरात भांडण झालं तर सर्वात मोठी जबादारी ही कुटुंब प्रमुखाची असते त्यांने सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच तुमचं घर एकसंघ राहू शकतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)