Chanakya Niti: ..तर माणूस स्वत:चाच शत्रू बनतो, चाणक्य नीती काय सांगते?

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या सवयी जर माणसाला असतील तर माणूस हा स्वत:चाच शत्रू बनतो. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti: ..तर माणूस स्वत:चाच शत्रू बनतो, चाणक्य नीती काय सांगते?
चाणक्य
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 26, 2025 | 9:02 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, त्या सवयी जर माणसाला असतील तर चाणक्य म्हणतात असा माणूस हा स्वत:चाच शत्रू बनतो. असा माणूस आपल्या हातानं आपलं सर्वात मोठं नुकसान करून घेतो, त्यामुळे आपल्यामध्ये असलेल्या अशा सवयी आपल्याला वेळेत ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे, जे माणसं अशा गोष्टींमधून सावध करून देखील बाहेर पडत नाहीत, असे व्यक्ती आपल्या हातानं आपलं मोठं नुकसान करू घेत असतात, तर जे व्यक्ती वेळीच सावध होतात आणि अशा सवयींचा त्याग करतात ते लोक आयुष्यात यशस्वी होतात. असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या या सवयी कोणत्या आहेत आणि चाणक्य यांनी काय म्हटलं आहे त्याबद्दल?

चाणक्य म्हणतात माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो बाहेर नाही, तर त्याच्या आतच आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला असलेल्या चुकीच्या सवयी हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो, जर एखाद्या व्यक्तीला काही चुकीच्या सवयी असतील तर त्या सवयी अशा व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या सोडून देण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

रागाच्या भरात घेतलेला निर्णय – चाणक्य म्हणतात राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, काही माणसं रागीट स्वभावाची असतात. त्यांना छोट्या -छोट्या गोष्टींवरून राग येतो. मात्र त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. तुम्ही अनेकदा रागाच्या भरात असा काही निर्णय घेतात, की त्यामुळे तुमचं एकट्याचंच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य देखील धोक्यात येऊ शकतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो, तेव्हा तो आपला विवेक गमावून बसलेला असतो, अशावेळी निर्णय घेणं म्हणजे स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारणं आहे, त्यामुळे अशा स्थितीत निर्णय न घेणं हेच तुमच्या हिताचं आहे, असा सल्ला चाणक्य देतात.

कोणावरही अतिविश्वास ठेवणं – चाणक्य म्हणतात या जगात जसे वाईट लोक आहेत, तसे चांगले देखील लोक आहेत, पण कोणावरही अतिविश्वास ठेवू नका, यामुळे तुम्ही एखाद्या दिवशी संकटात सापडाल. माणसानं नेहमी सावध असावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)