Chanakya Niti : आपली फसवणूक होतीये हे कसं ओळखाल? चाणक्य यांनी सांगितल्या या पाच खास गोष्टी
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील आपल्याला उपयोगी पडतात. चाणक्य म्हणतात जर तुमची कोणाकडून फसवणूक होत असेल तर तुम्हाला काही संकेत मिळतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की जग हे स्वार्थी लोकांनी भरलेलं आहे, आपल्याला आपल्या आजूबाजूचे स्वार्थी लोक ओळखता आले पाहिजेत. अनेकदा आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून आपला विश्वासघात होतो, त्यावेळी आपण मोठ्या संकटात सापडतो. असे काही व्यक्ती असतात, जे आपल्या खूप जवळचे असतात, त्यातील काही हे तुमचे मित्र असतील किंवा काहीजण तुमचे नातेवाईक असतील. अशा व्यक्तींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि ज्यावर आपण विश्वास ठेवला आहे, असा व्यक्ती प्रत्यक्षात आपली फसवणूक करत असतो. आपल्या विश्वासाचा फायदा तो घेतो. मात्र त्याच्या अशा वर्तनामुळे आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते, आपलं मोठं नुकसान होतं. त्यामुळे कोणावरही अतिविश्वास ठेवू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य पुढे म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती तुमची फसवणूक करत असतो, तेव्हा तो काही विशिष्ट संकेत देत असतो, हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. जर हे संकेत आपल्याला ओळखता आले तर आपली मोठी हानी टळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे.
हावभाव – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती तुमच्या नकळत तुमची फसवणूक करत असतो, किंवा तुमच्याशी खोटं बोलत असतो, असा व्यक्ती जेव्हा तुमच्यासोबत बोलत असतो तेव्हा तो कधीच तुमच्या डोळ्यांना डोळ भिडवणार नाही, तो सतत तुमच्याशी खाली पाहूनच बोलेल. तसेच त्यांचे खांदे देखील खाली झुकलेले असतील, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
बोलण्याची पद्धत – आर्य चाणक्य म्हणतात जे व्यक्ती तुमची फसवणूक करतात, हे तुमच्यासमोर बोलताना अतिशय आक्रमक पद्धतीने बोलतील, ते सतत आपला मुद्दा तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील. ते तुमचं म्हणणं न ऐकून घेताच आपणच कसे बरोबर आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करतील.
गोड बोलणं – चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमची फसवणूक करायची असते, तेव्हा तो तुमच्याशी कधीच उद्धटपणाने बोलत नाही. तो तुमची चूक कधीही दाखवणार नाही, तो फक्त तुमच्याशी कायम गोड-गोड बोलत राहील. एखादी गोष्टी तुम्ही चुकलात तरी देखील असा व्यक्ती ती गोष्ट बरोबरच होती, असं म्हणतो. जे व्यक्ती जास्त गोड बोलतात त्यांच्यापासून कायम सावध राहावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
घाई आणि दबाव – चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या पाठिमागे तुमची फसवणूक करत असतो, तेव्हा असा व्यक्ती तुमच्याशी बोलताना नेहमी घाई-घाईतच बोलेल. तो त्याचा प्रत्येक मुद्दा तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करेल.
टाळण्याचा प्रयत्न- चाणक्य म्हणतात जे नोकर मालकाची फसवणूक करतात, ते सातत्याने मालकाला टाळण्याचा प्रयत्न करत असतात, या सर्व संकेतांवरून तुम्ही आपली फसवणूक होत आहे का? हे लक्षात घेऊ शकता.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
