Chanakya Niti : या 5 संकेतांकडे कधीच दुर्लक्ष करून नका, ठरते आयुष्यातील सर्वात मोठी चूक

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणूस कधीकधी त्याच्या स्वभावामुळे मोठ्या संकटात सापडू शकतो, त्यामुळे माणसाने नेहमी आत्मचिंतन करण्याची गरज असते. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या 5 संकेतांकडे कधीच दुर्लक्ष करून नका, ठरते आयुष्यातील सर्वात मोठी चूक
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 17, 2026 | 9:24 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांच्यामते समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. माणसाला बाहेर कितीही शत्रू असले तरी त्यांच्याशी तुम्ही लढू शकतात, कारण ते शत्रू तुमच्या परिचयाचे असतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्याविरोधात योग्य नियोजन करून विजय मिळू शकतात. परंतु माणसाचा सर्वात मोठा आणि गुप्त शत्रू असतो, तो म्हणजे त्याचा स्वभाव, अनेकदा आपल्या स्वभावामुळे आपल्यापासून माणसं दुरावतात, अशी अनेक कामं असतात, जी सहज होण्यासारखी असतात, मात्र आपल्या स्वभावामुळे ती होत नाहीत, त्यामुळे माणसानं नेहमी सावध असलं पाहिजे. आपण दिवसातून कमीत कमी एकदा तरी आत्मचिंतन केलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य हाताने उद्ध्वस्त करता, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

चागले आणि वाईट यामधील फरक – चाणक्य म्हणतात आपल्यासाठी योग्य काय आहे? आणि आपल्यासाठी अयोग्य काय आहे? याचा फरक आपल्याला समजला पाहिजे. जर आपल्याला फरक समजला नाही, आपण चागलं आणि वाईट यामधील फरक समजू शकलो नाही तर ती आपल्या आयुष्याच्या पतनाची सुरुवात असते. व्यक्ती लवकरच वाईट वळणाला लागतो, त्यामुळे त्याचं आयुष्यात मोठं नुकसान होतं.

गर्व – चाणक्य म्हणतात माणसानं आयुष्यात कधीही गर्व होऊ देऊ नये, कारण गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा गर्व होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा चुकीचे निर्णय घेतात, त्यामुळे तुम्ही संकटात सापडतात. त्यामुळे माणसाला स्वाभिमान असावा पण अभिमान असू नये.

मोठ्या व्यक्तीचा अपमान – चाणक्य म्हणतात आपल्यापेक्षा जे मोठे लोक असतील तर त्यांचा कधीच अपमान करू नका, कारण त्यांचा अनुभव हा आपल्यापेक्षा मोठा असतो, त्यांच्या ज्ञानाचा आदर करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा.

शॉर्टकट – चाणक्य यांच्या मते यशाला कष्टाशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे आयुष्यात यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकट वापरू नका, त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता.

पैशांची उधळपट्टी – चाणक्य म्हणतात जे लोक पैशांची उधळपट्टी करतात असे लोक त्यांच्या नंतरच्या आयुष्यात मोठ्या संकटात सापडतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)