Chanakya Niti : या तिघांना झोपेतून जागं करण्याची चूक कधीच करू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य म्हणतात की जगात असे तिघं आहेत, ज्यांना कधीही झोपेतून उठवण्याची चूक करू नये.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात काही संकटं ही अशी असतात की जी अकस्मात येतात. त्याला आपण काहीच करू शकत नाही. अशा संकटांच्या काळात खचून न जाता, त्यावर योग्य मार्ग शोधल्यास आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकतं, परंतु काही संकट ही अशी असतात, की जी आपण स्वत: ओढून घेतो, अशा संकटामुळे आपण मोठ्या अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो विचारपूर्वकच घेतला पाहिजे. हेच सांकेतिक भाषेत सांगताना चाणक्य यांनी तीन उदाहरणं दिली आहे. चाणक्य म्हणतात या जगात असे तिघं आहेत, ज्यांना तुम्ही कधीच झोपेतून जागं केलं नाही पाहिजे, ते जर झोपेतून जागे झाले तर तुम्ही मात्र मोठ्या संकटात सापडू शकता, प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
सिंह – चाणक्य म्हणतात सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, त्याची एक वेगळीच दहशत असते. समजा तुम्ही एखाद्या जंगलामध्ये फिरायला गेलात आणि तिथे तुमची गाठ सिंहाशी पडली, तो जर झोपलेला असेल तर त्याला जागं करण्याची चूक करू नका, सिंह जर जागा झाला तर तुम्ही मोठ्या संकटामध्ये सापडू शकता, तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे जंगलामध्ये असताना कधीही सिंहाला झोपेतून जागं करण्याची चूक करू नका.
लहान मुलं – चाणक्य म्हणतात लहान मुलांना कधीही झोपेतून उठवू नका, जर तुम्ही लहान मुलांना झोपेतून उठवलं आणि त्याची झोप पूर्ण झाली नाही तर तो रडून -रडून संपूर्ण घर डोक्यावर घेऊ शकतो, त्याला शांत करण्यासाठी तुमची ऊर्जा खर्च होते.
राजा – चाणक्य म्हणतात राजाला देखील कधीही झोपेतून उठवू नये, राजाची झोप पूर्ण नाही झाली आणि त्याला जर राग आला तर तो तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा देखील देऊ शकतो. त्यामुळे काहीही झालं तरी राजाला झोपेतून उठवू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)