Chanakya Niti : ही पाच कामं कधीच पुढे ढकलू नका, आयुष्यात होईल फार मोठं नुकसान, चाणक्यांनी सांगितला यशाचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. वेळेचं महत्त्व समजून सांगताना चाणक्य म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी पाच कामं असतात जी वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा तुमचं आयुष्यात फार मोठं नुकसान होतं आणि तुमच्यावर पश्चतापाची वेळ येते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : ही पाच कामं कधीच पुढे ढकलू नका, आयुष्यात होईल फार मोठं नुकसान, चाणक्यांनी सांगितला यशाचा मंत्र
CHANKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 8:57 PM

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी आजही मार्गदर्शक ठरतात. माणसाने आपल्या आयुष्याचं यशस्वी व्यवस्थापन कसं करावं? याचं सार चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वत महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वेळ. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा अनेक गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही गमावल्या तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात परत मिळवू शकतात. परंतु वेळ ही अशी गोष्ट आहे, जी परत कधीही येत नाही. त्यामुळे माणसाने वेळ पाळलीच पाहिजे. माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, त्या जर त्याने वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर त्याला त्याच्या आयुष्यात फार मोठी किंमत मोजावी लागते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

शिक्षण – चाणक्य म्हणतात शिक्षणाला एक विशिष्ट वय असते, त्याच काळात तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मोठे होतात, तेव्हा तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी येते, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत.

Loading...

कर्जफेड – चाणक्य म्हणतात माणसाने आपल्यावर असलेलं कर्जत हे नेहमी वेळेतच फेडलं पाहिजे, जर तुम्ही कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली, किंवा विलंब केला तर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आणि तुम्ही त्या खाली दबले जातात.

विवाह – चाणक्य म्हणतात विवाह ही एक अशी गोष्टी आहे, जी योग्य वेळेत आणि योग्य वयातच व्हायला हवी, जर विवाहाला उशिर झाला तर भविष्यात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी विवाह हा योग्य वेळेतच व्हायला पाहिजे.

वाईट गोष्टी सोडून देणे – चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीला एखाद्या वाईट गोष्टीची सवय असते, अशा गोष्टी वेळेत सोडणेच योग्य असतं.

धर्म, पुण्य कर्म – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्याचा काहीही भरोसा नसतो, त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात दान धर्म केला पाहिजे आणि योग्य वेळेतच केला पाहिजे, आज करू, उद्या करू अशी टाळाटाळा करता कामा नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us