Chanakya Niti : आयुष्यातली ही 4 गुपितं कधीच कोणाला सांगू नका, चाणक्य यांचा मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीकडे अशा काही गोष्टी असतात, गुपित असतात, जे कधीही कोणालाही सांगू नये.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. अनेकजण आयुष्यात कधी-कधी चुकीचा निर्णय घेतात, आणि या एका निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. त्यामुळे माणसाने नेहमी विचारपूर्वकच पाऊल उचलावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच माणसाच्या आयुष्यात अशी काही गुपीत असतात, जी कोणालाही सांगू नयेत, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात तुमच्या कितीही जवळचा माणूस असू द्या, अगदी तुमची पत्नी देखील असेल तरी देखील तिला काही गोष्टी या न सांगण्यातच तुमचं हीत आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
कमाई – चाणक्य म्हणतात तुम्ही किती कमवता? तुमचा पगार किती आहे? तुमची संपत्ती किती आहे याबद्दल कधीही कोणाला सांगू नका, याचे दोन धोके आहेत, जर तुमची संपत्ती जास्त असेल तर तुम्हाला शत्रू निर्माण होऊ शकतात. तसेच जर तुमच्याकडे संपत्ती नसेल तर हा समाज तुम्हाला मान सन्मान देणार नाहीत. त्यामुळे या गोष्टी कोणालाही सांगू नयेत.
लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध – चाणक्य म्हणतात जर तुमचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध असतील, परंतु तुम्ही सध्या तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रामाणिक आहात, तर अशावेळी पूर्वीच्या गोष्टी पती-किंवा पत्नीला सांगण्यात अर्थ नसतो, कारण त्यामुळे उगाच एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण होऊ शकतो.
कमकुवत बाजू – चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असते जी की ती गोष्ट संबंधित व्यक्तीचा वीक पॉइंट असते, अशा गोष्टी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असूद्या, तरीही कधीच कोणाला सांगू नका.
नियोजन – चाणक्य म्हणतात तुम्ही जर भविष्याच्या दृष्टीने काही नियोजन करत असाल तर अशा गोष्टी कोणालाही सांगू नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)