Chanakya Niti : तुमच्या आयुष्यातील या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या गोष्टी त्याने कोणालाही सांगता कामा नये, त्यामुळे त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti : तुमच्या आयुष्यातील या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
CHANAKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 9:23 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतातच त्या गोष्टींमुळे तुमची अडचण निर्माण होऊ शकते. परंतु या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका, त्या गोष्टी तुमच्या मनात ठेवून त्यावर योग्य तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा, परंतु तुम्ही जर या गोष्टी कोणासोबत शेअर केल्या तर अनेकदा समोरचा व्यक्ती तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊ शकतो, त्यामुळे भविष्यात तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे कधीही आपल्या अशा गोष्टी कोणालाही सांगता कामा नये, समजा तुमच्या खूप जवळचा मित्र आहे, आणि तुम्ही त्याला तुमच्या मनातील काही गोष्टी सांगितल्या, परंतु उद्या काही कारणांमुळे तुमचं त्याच्यासोबत भांडण झालं तर तो तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी अशा गोष्टींचा वापर करू शकतो, त्यामुळे तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी या गोष्टी गुप्त ठेवण्यातच हित असतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

तुम्ही किती कमवता – चाणक्य म्हणतात तुम्ही किती पैसे कमवता? ही गोष्ट माणसाने नेहमी गुप्त ठेवली पाहिजे, तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून किती नफा होतो? ही गोष्ट कधीही कोणाला सांगू नका, कारण जर अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीला माहीत झाल्या तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवा स्पर्धक तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवीन स्पर्धक तयार झाला तर त्यामुळे तुमचं भविष्यात नुकसान होऊ शकतं.

अडचणीच्या गोष्टी – चाणक्य म्हणता कोणताच व्यक्ती हा कधीही परिपूर्ण असू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही न काही तरी कमीपणा असतो, आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, परंतु अशा गोष्टी कधीही कोणासोबत शेअर करू नका. कारण जर तुम्ही तुमच्या अशा गोष्टी कोणाला सांगितल्या तर लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात, त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

नियोजन – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्ती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काही न काही तरी प्लॅन तयार करत असतो, परंतु असे प्लॅन तुम्ही कधीही कोणाला सांगू नका, कारण तुम्ही जर तुमचे भविष्यातील प्लॅन कोणाला सांगितले तर लोक तुमचा फायदा घेऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us