AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरनूर ब्रारला टीम इंडियात इतक्या संधी देण्याचं कारण काय? झहीर खानने स्पष्टच सांगितलं की..

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेत गुरनूर ब्रार कसोटी डेब्यू करण्याची शक्यता आहे. पण गुरनूर ब्रारला इतक्या संधी देण्याचं कारण काय? झहीर खानने सांगितलं कारण

गुरनूर ब्रारला टीम इंडियात इतक्या संधी देण्याचं कारण काय? झहीर खानने स्पष्टच सांगितलं की..
गुरनूर ब्रारला टीम इंडियात इतक्या संधी देण्याचं कारण काय? झहीर खानने स्पष्टच सांगितलं की..Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 10, 2026 | 8:51 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. असं असताना या मालिकेत गुरनूर ब्रारचं नाव चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे नाव चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे गुरनूर ब्रारला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फारसा अनुभव नाही. तरीही संघ व्यवस्थापन गुरनूर ब्रारला प्रत्येक फॉर्मेटमध्ये वारंवार संधी देण्यासाठी आग्रही आहे. असं का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडल्याशिवाय राहात नाही. माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने गुरनूर ब्रार वारंवार संधी देण्याचं कारण उघड केलं आहे. एका मुलाखतीत झहीर खानने सांगितलं की, या खेळाडूमध्ये दीर्घ आणि यशस्वी कारकि‍र्द घडवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला वारंवार संधी दिली जात आहे. त्याला इतक्या इतक्या लवकर बढती मिळल्याचा आनंद देखील आहे.

झहीर खानने केली गुरनूरची प्रशंसा

गुरनूर ब्रारचं कौतुक करताना झहीर खान म्हणाला की, ‘मला ठाम विश्वास आहे की, गुरनूर ब्रारमध्ये एक चांगली आणि दीर्घकाळ टिकणारी कारकिर्द घडवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला इतक्या झटपट संधी मिळणं चांगली गोष्ट आहे. मी त्याच्यासोबत काही वेळ घालवला आहे. मला त्याच्या प्रचंड क्षमता दिसली आहे.’ झहीर खानने त्याचं कौतुक केल्यानंतर म्हणाला की, ‘गुरनूर ब्रारची कारकिर्द पुढे कशी जाते हे आता येत्या काही काळात दिसून येईल. पण त्याच्यातील क्षमतेने मी सर्वाधिक प्रभावित झालो आहे.’ गुरनूर ब्रारमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची क्षमता आहे. उंच बांधा असून चेंडूला अतिरिक्त उसळी देण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे चांगला शॉर्ट बॉल आहे. तसेच वेगाने फलंदाजाला चकवू शकतो.

गुरनूरसाठी चांगली सुरूवात

गुरनूर ब्रार हा 26 वर्षांचा असून भारतीय संघात वनडे सामन्यांसाठी निवड झाली आहे. त्याने सहा वनडे सामन्यात 11 विकेट काढल्या आहे. तर सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध तीन विकेट काढल्या. तसेच नाबाद 36 धावाही केल्या. जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका अ संघाविरूद्धच्या सामन्यात 10 विकेट काढल्या होत्या. आता त्याला या कामगिरीच्या जोरावर कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. इतकंच काय तर खालच्या फळीत गुरनूर फलंदाजीही करू शकतो.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप