AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्राइम पेट्रोलच्या या भागाला प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती, मिळाले 231 मिलियन व्ह्यूज, फ्रीमध्ये पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

ना चित्रपट, ना वेब सीरिज, क्राइम पेट्रोलच्या या भागाला मिळाले 231 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज. YouTube वर या भागाची होतेय प्रचंड चर्चा. कथा ठरतेय सुपरहिट.

क्राइम पेट्रोलच्या या भागाला प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती, मिळाले 231 मिलियन व्ह्यूज, फ्रीमध्ये पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 11, 2026 | 1:10 PM
Share

‘क्राइम पेट्रोल डायल 100’च्या पहिल्या सीझनमधील 25वा भाग असलेल्या ‘दांव-पेच’चे प्रसारण 23 नोव्हेंबर 2015 रोजी झाले होते. सुमारे 42 मिनिटांच्या या एपिसोडमध्ये प्रेम, फसवणूक, लालसा आणि हत्येच्या कटाभोवती फिरणारी रहस्यमय कथा दाखवण्यात आली आहे.

कथेच्या केंद्रस्थानी गोखले नावाचा यशस्वी फौजदारी वकील आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठे गुपित दडलेले असते. तसेच त्याचे स्वतःच्या सेक्रेटरीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचेही समोर येते. याच नात्यामुळे पुढे कथेला धक्कादायक वळण मिळते.

या भागाची कथा काय?

गोखले यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हल्लेखोराची गोळी गोखले यांना न लागता एका महिला आणि तिच्या चार वर्षांच्या मुलीला लागते. या घटनेत दोघींचा मृत्यू होतो. त्यानंतर पोलिसांसमोर गोखले यांना मारण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला, हा मोठा प्रश्न उभा राहतो. तपास जसजसा पुढे जातो, तसतसे गोखले यांच्या खासगी आयुष्यातील अनेक धक्कादायक रहस्ये उघड होऊ लागतात.

या एपिसोडची खासियत म्हणजे संपूर्ण कथा एका भागातच पूर्ण होते. आज या एपिसोडला मिळालेली डिजिटल लोकप्रियता ही त्याची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. SonyLIV वरही ‘दांव-पेच’चा अधिकृत एपिसोड उपलब्ध आहे.

23 कोटींहून अधिक व्ह्यूज

दरम्यान, 2003 मध्ये सुरू झालेल्या ‘क्राइम पेट्रोल’ या शोने भारतीय टेलिव्हिजनवरील क्राइम स्टोरी सांगण्याची पद्धतच बदलली. 9 मे 2003 रोजी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर या शोची सुरुवात झाली. सुभ्रमण्यम एस. अय्यर यांनी या शोची निर्मिती केली होती. भारतातील वास्तविक गुन्हेगारी घटनांवर आधारित कथा नाट्यमय पद्धतीने सादर करणे ही या शोची प्रमुख ओळख ठरली.

जुन्या एपिसोडला मिळालेला 23 कोटींहून अधिक व्ह्यूजचा प्रतिसाद पाहता, रहस्यमय आणि गुंतागुंतीच्या गुन्हेगारी कथांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आजही कायम असल्याचे स्पष्ट होते.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप