Chanakya Niti : माणसाने या तीन गोष्टींसाठी कधीच लाजू नये, चाणक्य नेमकं काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात, त्या प्रसंगामध्ये माणसाने कधीही लाजू नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. राजा धनानंदाच्या राजदरबारात चाणक्य यांचा अपमान झाला होता, या अपमानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा चाणक्य यांनी घेतली होती, त्यानंतर त्यांनी आपल्या कुटनीतीच्या बळावर राजा धनानंदची राजवट उद्ध्वस्त केली आणि, चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. या काळात तसेच चाणक्य यांना आयुष्यभर जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये लिहून ठेवलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात, या प्रसंगात माणसाने कधीही लाजू नये, अशा प्रसंगाचा धैर्याने सामना करावा, तुम्हाला यश नक्की मिळेल, तुमचा विजय होईल. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? तसेच हे तीन प्रसंग नेमके कोणते आहेत? त्याबद्दल.
गरीबी – चाणक्य म्हणतात माणसाने कुठे जन्माला यावं हे त्याच्या हातात नसतं, तुम्ही जर गरीब कुटुंबात जन्माला आलात, तर गरिबीची कधीही लाज बाळगू नका, परिस्थितीची जाणीव ठेवा, आणि एवढे कष्ट करा की तुम्ही जन्माला जरी गरीब म्हणून आला असाल, परंतु त्यानंतर कष्टाच्या जोरावर श्रीमंत व्हा.
कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कोणंतही काम हे हलकं किंवा भारी नसतं, तुमचं आयुष्य कष्टांमुळेच तरणार आहे, त्यामुळे आयुष्यात कष्ट करा. कष्ट करण्याची लाज बाळगू नका, मिळेल ते काम करा, परंतु काम करत रहा. कष्ट ही अशी गोष्ट आहे, जी एक दिवस तुम्हाला रंकाचा राव बनवते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जेवण – चाणक्य म्हणतात माणसाने कधीही जेवताना लाजू नये, जेवणं हे तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं, त्यामुळे जेवत असताना कधीही लाजू नये, माणसाने नेहमी पोटभर जेवलं पाहिजे, उपाशी राहू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)