AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Train Ticket Rate : रेल्वे तिकीटांचे दर वाढणार ?, IRCTCच्या कमाईवर मोठा परिणाम, सरकार घेणार निर्णय ?

युपीआयने रेल्वेच्या तिकीटांची खरेदी वाढून आता ५१.२२ टक्के इतकी जास्त झाली आहे. त्यामुळे रेल्वेच्या आयआरसीटीसी कंपनीचा नफा घटला आहे. त्यामुळे भविष्यात युपीआयने तिकीट बुकींग महागण्याची चिन्हे आहेत.

Train Ticket Rate : रेल्वे तिकीटांचे दर वाढणार ?, IRCTCच्या कमाईवर मोठा परिणाम, सरकार घेणार निर्णय ?
indian railway
| Updated on: Aug 16, 2026 | 8:07 PM
Share

IRCTC UPI Ticket Booking News: जर तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी युपीआयचा वापर करत असाल तर येत्या काळात तिकीटांवर चार्ज लागण्याची शक्यता आहे. कारण युपीआयने तिकिट बुकींगमध्ये वाढ होत असल्याने असे घडणार आहे. आयआरसीटीसीच्या ( IRCTC ) आकड्यांनुसार युपीआयने तिकीट बुक करणाऱ्यांची संख्या अर्ध्याहून अधिक झाली आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या कमाईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे युपीआयने तिकीट खरेदी करणे महागात पडू शकते असे म्हटले जात आहे.

IRCTC ने जाहीर केलेल्या साल २०२६-२७ च्या पहिल्या तिमाही आकडेवारीनुसार ऑनलाईन तिकीटांच्या बुकींगमध्ये युपीआयचा वाटा वाढून आता ५१.२२ टक्के झाला आहे. एक वर्षांपूर्वी हा आकडा ४८.७२ टक्के होता. आता ऑनलाईन बुकींग करताना १०० तिकीटांच्या मागे ५१ हून अधिक तिकीटे युपीआयद्वारे बुक होत आहेत. IRCTC ने २४८ करोड़ रुपये कमवले

IRCTC ने तीन महिन्यांत १३.२७ कोटी तिकीटांद्वारे २४८ कोटी रुपयांची सर्व्हीस फी कमावली आहे. म्हणजे सररारी १९ रुपये प्रति तिकीट फी मिळाली आहे. युपीआयने पेमेंट केल्यानंतर सर्व्हीस फी १० ते २० रुपये मिळते. जर कार्ड, क्रेडिट लाईनने पेमेंट केल्यानंतर १५ ते ३० रुपयांपर्यंत सर्व्हीस फी मिळते. म्हणजे दोन्ही पेमेंटच्या पद्धतीत फीमध्ये फरक आहे.

आयआरसीटीसीटे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राहुल हिमालियन यांनी म्हटले आहे की युपीआयचा जास्त वेगाने वापर सुरु झाला आहे. आणि याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर होत आहे. कंपनीने युपीआय आणि अन्य पेमेंट पद्धतींना वेगवेगळी सर्व्हीस फी ठेवली आहे. या नंतरही युपीआयच्या जास्त वापराने सर्व्हीस फीच्या कमाईचा वेग आठला आहे.

संसदीय समितीने दिला सल्ला

या प्रकरणात संसदीय समितीच्या वित्त समितीने देखील चिंता व्यक्त केली आहे. समितीने म्हटले आहे की युपीआयवर सध्या झिरो MDR आहे. MDR म्हणजे पेमेंट घेण्यावर लागणारा चार्ज. समितीने सल्ला दिला आहे की जास्त रकमेच्या डिजिटल देवाण-घेवाणीवर एक फिक्स आणि मर्यादित MDR लावला जाऊ शकतो. म्हणजे डिजिटल पेमेंटवरील खर्चाचा दबाव कमी होईल.

आता युपीआयने ट्रेनचे तिकीट बुक केल्यावर कोणताही नवा चार्ज लागू होत नाही. मात्र, जास्त रकमेच्या डिजिटल पेमेंटवर MDR लावण्याचा सल्ला दिला गेला आहे. जर पुढे यावर सरकारने निर्णय घेतला तर त्याचा परिणाम युपीआयने तिकीट बुक करण्याच्या फिवर पडू शकतो. म्हणडे युपीआयने तिकीट खरेदी करणे भविष्यात महागात पडणार आहे.

Follow Us