AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई होण्याआधीच समंथा रुथ प्रभुने घेतली मोठी जबाबदारी, ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक

गेल्या अनेक दिवसांपासून समंथा रुथ प्रभु ही सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. अशातच आता ती आई होण्याआधीच एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

आई होण्याआधीच समंथा रुथ प्रभुने घेतली मोठी जबाबदारी, ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 16, 2026 | 8:03 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील एका खास टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचवेळी ती एका नव्या आणि हटके प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. समंथा आता अभिनयासोबतच एका कुकिंग रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ तमिळ’ या शोसाठी समंथाची निवड करण्यात आली आहे.

समंथासाठी हा प्रोजेक्ट विशेष महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंतच्या तिच्या कामापेक्षा या शोमधील तिची भूमिका पूर्णपणे वेगळी असणार आहे. या कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार असून ते किचनमध्ये विविध पदार्थ बनवताना आणि एकमेकांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करताना पाहायला मिळणार आहेत.

नव्या प्रोजेक्टसाठी समंथा उत्सुक

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ तमिळ’मध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करण्याबाबत समंथाने उत्साह व्यक्त केला आहे. या शोबद्दल प्रेक्षकांना सांगण्यासाठी आपण बऱ्याच काळापासून वाट पाहत असल्याचं तिने सांगितलं.

‘मी या शोबद्दल प्रेक्षकांना सांगण्याची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ तमिळ’सारखा प्रोजेक्ट मी यापूर्वी कधीच केलेला नाही आणि हीच गोष्ट मला या शोच्या दिशेने आकर्षित करणारी ठरली’ असं समंथाने म्हटलं आहे.

‘खाणं म्हणजे फक्त भूक भागवणं नाही’

शोच्या निमित्ताने समंथाने खाण्याबद्दलची आपली विचारसरणीदेखील व्यक्त केली. तिच्या मते, खाणं हे केवळ भूक भागवण्याचं साधन नसून त्यातून नाती जोडली जातात आणि सुंदर आठवणी निर्माण होतात.

‘खाणं म्हणजे फक्त भूक भागवण्याचा मार्ग नाही, तर लोकांना जवळ आणण्याचा आणि त्यांच्यासोबत आठवणी निर्माण करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. एखादी व्यक्ती जेव्हा स्वयंपाक करते, तेव्हा तिच्यातील असा एखादा पैलू समोर येऊ शकतो, जो सामान्यपणे कॅमेऱ्यासमोर पाहायला मिळत नाही’ असं समंथाने सांगितलं.

कलाकार किचनमध्ये कसे काम करणार?

तमिळ चित्रपटसृष्टीतील आवडते कलाकार किचनमध्ये कशाप्रकारे काम करतात, हे पाहण्याची समंथालाही उत्सुकता आहे. कलाकार स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर किती जोखीम घेतात, चुका झाल्यानंतर त्यातून कशाप्रकारे शिकतात, हे पाहणं रंजक ठरेल, असं तिने म्हटलं.

या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना वेगवेगळ्या कुकिंग चॅलेंजेसचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचा अभिनयापेक्षा पूर्णपणे वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.

Follow Us
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र