AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर यांच्यासमोरच उत्तर प्रदेशच्या DGP चीं भन्नाट तक्रार, उपस्थितींना हसूच आवरेना! काय केला सवाल?

Uttar Pradesh DGP on Nana Patekar: एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालकांनी नाना पाटेकर यांना पाहताच एक भन्नाट तक्रार केली. त्यांच्या या मिश्किल प्रश्नाने सभेत एकच हाश्या पिकला. त्यांच्या तक्रारीनंतर तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. काय आहे ती तक्रार?

नाना पाटेकर यांच्यासमोरच उत्तर प्रदेशच्या DGP चीं भन्नाट तक्रार, उपस्थितींना हसूच आवरेना! काय केला सवाल?
नाना पाटेकर यांच्यासमोरच उत्तर प्रदेशच्या DGP चीं भन्नाट तक्रारImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 16, 2026 | 7:56 PM
Share

एका कार्यक्रमादरम्यान नाना पाटेकर यांना उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी (DGP) एक भन्नाट तक्रार केली. त्यांच्या या प्रश्नाने या सभेत एकच हास्य पिकला. अर्थात ही तक्रार हिंदी चित्रपटातील पोलिसांच्या भूमिकेविषयी होती. हिंदी सिनेमात अनेकदा गुन्हा घडल्यानंतर अथवा खलनायकाने सगळ्यांना त्रास दिल्यानंतर, मारामारी झाल्यानंतरच पोलीस पोहचतात हे आपण पाहिले आहे. सिनेमात पोलीस गुन्हा घडल्यानंतरच नेहमी उशिरानेच येतात, असे दाखवण्यात येते. त्यावरून डीजीपींनी मजेशीर तक्रार केली. सिनेमात पोलीस उशीराच का येतात? असा सवाल त्यांनी करताच एकच हास्यकल्लोळ उठला.

आता नाना पाटेकर योग्य कारवाई करतील

या कार्यक्रमात उत्तर प्रदेशमधील पोलीस महासंचालकांनी चित्रपटातील पोलीसांच्या उशीरा होणार्‍या एंट्रीवर सवाल केला. सिनेमात नेहमी पोलीस उशीराच का येतात असा तक्रारीचा सूर त्यांनी आवळताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत हास्याचा ठेका धरला. या ठिकाणी आता नाना पाटेकर उपस्थित आहेत. त्यामुळे तक्रार नोंदवल्यानंतर त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. या हास्यविनोदाला पाटेकर यांनीही मनमुराद दाद दिली.

लघुपटात नाना पाटेकर

उत्तर प्रदेश पोलिसांनी सायबर फसवणूक आणि डिजिटल अरनेस्टच्या घटनांविरोधात जाणीव जागृतीसाठी नाना पाटेकर यांच्यासोबत एक लघुपट तयार केला आहे. या लघुपटात नाना पाटेकर एका जागरुक नागरिकाची भूमिका साकारत आहेत. सायबर फसवणुकीचा डाव वेळीच ओळखून त्याविरोधात ते लढा उभारताना या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. या लघुपटामुळे समाजात सायबर फसवणुकीविरोधात जागरूकता येईल असा पोलिसांचा विश्वास आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना डिजिटल अरनेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन या कार्यक्रमादरमान केले. हिंदी चित्रपटातील पोलिसांच्या भूमिकेवर डीजीपींनी मिश्किल टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर नाना पाटेकर यांनाही हसू आवरले नाही.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लिहिले की, सर आजही तशीच परिस्थिती आहे. तर दुसऱ्याने तुम्ही बरोबर बोललात सर, त्यात नवीन काही नाही, अशी टिप्पणी केली. तर एका युझरने नाना पाटेकर यांच्या तिरंगा चित्रपटाचा उल्लेख केला. तर एका युझरने पोलिसांनाच एकदम खणखणीत टोला हाणला. हे नाटक बंद करा सर, किमान चित्रपटांमध्ये तरी पोलीस वेळेवरच येतात, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...