Chanakya Niti : ज्यांच्या मुलांमध्ये असतात हे गुण ते आई-वडील भाग्यवान, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. मुलांचे आपल्या पालकांप्रती काय कर्तव्य आहे? याबाबत चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

Chanakya Niti : ज्यांच्या मुलांमध्ये असतात हे गुण ते आई-वडील भाग्यवान, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 8:04 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात, ज्या आई-वडिलांपोटी गुणवान मुलगा जन्माला येतो, तो मुलगा आपल्या गुणांमुळे संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. परंतु जर अवगुणी मुलगा जन्माला आला तर त्या संपूर्ण कुळाचा लवकरच नाश होतो. त्यामुळे मुलांवर योग्य संस्कार करणं ही फार मोठी जबाबदारी आई-वडिलांची असते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केलाच पाहिजे, परंतु जर तुमचं मुल चुकत आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा हात धरून त्याला योग्य मार्गावर आणणे ही तुमची जबाबदारी आहे. मुलांवर त्यांच्या लहान वयातच योग्य संस्कार झाले पाहिजेत. लहान वयातील संस्कार किती महत्त्वाचे असतात? हे दाखवण्यासाठी चाणक्य एक उदाहारण देतात. चाणक्य म्हणतात जोपर्यंत बांबू कोवळा आहे, तोपर्यंतच त्याला आपण वाकवू शकतो. तुम्हाला हवा तसा आकार त्याला देता येतो. परंतु एकदा तो निब्बर झाला की ही गोष्ट शक्य नसते. मानवी जीवनाचं देखील असंच आहे. काही असे गुण आहेत, ते जर मुलांमध्ये उपजतच असतील तर ते आई-वडील भाग्यवान ठरतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

अज्ञाधारकरपणा – चाणक्य म्हणतात ज्या मुलांच्या आंगी अज्ञाधारकपणा असतो, जी मुलं आपल्या आई वडिलांच्या अज्ञेचं पालन करतात, अशी मुलं कधीही चुकीच्या किंवा वाईट संगतीला लागत नाहीत. अशा मुलांचे आई-वडील हे खऱ्या अर्थाने भाग्यवान असतात. त्यामुळे मुलं ही अज्ञाकारी असावीत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

हुशारी – चाणक्य म्हणतात काही मुलं ही मुळातच हुशार असात, तर काही मुलांना तुम्ही कितीही शिकवला, त्यांना कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगा ते पालथ्या घड्यावर पाणी असतं. त्यामुळे ज्या पालकांची मुलं ही हुशार असतात, बुद्धिवान असतात, ते पालक हे एक जगातील सर्वात भाग्यवान पालक असतात.

शिक्षणाची आवड – चाणक्य म्हणतात शिक्षणामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून येतो. शिक्षणामुळे चांगला रोजगार मिळतो. त्यामुळे ज्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड असते, अशा मुलांचे आई-वडील हे खऱ्या अर्थाने भाग्यवान असतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us