AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देणं न घेणं तरी देसी गर्ल रडारवर! क्रिती सेननच्या राखी जाहिरात प्रकरणात प्रियंक चोप्रावरही टीका? पण का?

रक्षाबंधन सणापूर्वी एक जाहिरात चर्चेत आली होती. क्रिती सेननच्या जाहिरातीवरून बराच राडा झाला होता. आता या प्रकरणात प्रियंका चोप्राला खेचलं जात आहे. खरं तर या जाहिरातीशी तिचं काही देणं घेणं नाही. तरी तिच्यावर टीका होत आहे. असं का ते जाणून घ्या..

देणं न घेणं तरी देसी गर्ल रडारवर! क्रिती सेननच्या राखी जाहिरात प्रकरणात प्रियंक चोप्रावरही टीका? पण का?
देणं न घेणं तरी देसी गर्ल रडारवर! क्रिती सेननच्या राखी जाहिरात प्रकरणात प्रियंक चोप्रावरही टीका? पण का?Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 01, 2026 | 9:18 PM
Share

रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून एक जाहीरात चित्रित केली गेली होती. पण या जाहिरातीवरून प्रोडक्टचं प्रमोशन होण्याऐवजी वादाला फोडणी मिळाली होती. ज्वेलरीच्या फेस्टिव कॅम्पेनसाठी ही जाहिरात चित्रित केली होती. पण क्रिती सेननच्या कपड्यांवरून बराच वाद रंगला. इतकंच काय तर सोशल मीडियावर या जाहिरातीवरून ट्रोल गेलं. अभिनेत्री आणि खासदार असलेल्या कंगना रणौत हीनेही टीकास्त्र सोडलं होतं. आता या जाहिरात प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. या जाहिरातीशी तसं काहीच देणं घेणं नसताना प्रियंका चोप्राला खेचलं जात आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर या प्रकरणावर तिने कुठेच भाष्यही केलेलं नाही. त्यामुळे प्रियंका चोप्राने नेमकं केलं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जाहिरात प्रकरणात प्रियंका चोप्राचं नाव तिच्यामुळे नाही तर तिची आई मधु चोप्रामुळे आलं आहे. या प्रकरणावर तिने आपलं मत मांडलं होतं. प्रियंकाच्या आईचं मत ऐकूनच आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. मधु चोप्रा म्हणाल्या की, ‘माझे शरीर, माझ्या आवडीनिवडी पूर्णपणे योग्य आहेत, पण मर्यादा असणे महत्त्वाचे आहे. आत्मसन्मान राखणे आणि इतरांच्या भावना व मूल्यांचा आदर करणे हे देखील महत्त्वाचे आहे. जिथे असे कपडे घालणे सामान्य आहे, तिथे तुम्ही ते घालू शकता, पण इथे ते सामान्य नाही. मला माफ करा, पण मला असेच वाटते.’ मुंबईतील ‘वुमन बिल्डिंग सिनेमा टुगेदर’ कार्यक्रमात त्यांनी या वादावर भाष्य केलं होतं.

मधु चोप्रा इतक्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी आपल्या मुलांचा उल्लेख केला आणि वादाला फोडणी मिळाली. मधु चोप्रा म्हणाल्या की, ‘माझी मुलेसुद्धा कामासाठी आणि त्यांना आवडतात म्हणून असे कपडे घालतात. पण माझा असाही विश्वास आहे की, त्यांचा पेहराव प्रसंगानुरूप आणि सुंदर असावा. जर तो प्रसंगानुरूप दिसत नसेल, तर टीका होणे स्वाभाविक आहे.’ मधु चोप्रांचं हे विधान ऐकून आता ट्रोलर्सला आयती संधी मिळाली आहे. प्रियंका चोप्राच्या कपड्यांवरून आता तिला ट्रोल केलं जात आहे. यावेळी ट्रोलर्संनी काही जुने संदर्भ देत टीका केली आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?