Chanakya Niti : या 4 लोकांची संगत असते मृत्यू समान, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. व्यक्तीनं आपल्या आयुष्यात कोणाची संगत करावी? आणि कोणाची संगत करू नये? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

आर्य चाणक्य हे भारताच्या इतिहासामधील एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. सोबतच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी माणसांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या समस्या येऊ शकतात? आणि जर अशा समस्या आल्या तर त्यातून मार्ग कसा काढायचा? याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात अशा काही गोष्टी आणि व्यक्ती आहेत, ज्यांची संगत ही मृत्यू समान असते, हळू-हळू अशा गोष्टी तुम्हाला मृत्यूच्या दिशेनं घेऊन जातात, त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही नेहमी दूर राहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
भांडखोर पत्नी – चाणक्य म्हणतात जर तुमची पत्नी ही भांडखोर असेल, छोट्या-छोट्या गोष्टींवरून सारखी चिडचिड करत असेल तर अशा पत्नीपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण जर तुमची पत्नी ही भांडखोर असेल तर घरात कधीच शांतता राहणार नाही, त्याचा परिणाम हा तुमचा मनावर होईल, तुमची चिंता वाढेल परिणामी चिंता वाढली की त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर देखील होतो, आणि त्यामुळे तुमचं आयुष्य कमी होण्याचा धोका असतो, त्यामुळे माणसानं नेहमी अशा ठिकाणीच वास्तव्य करावं, जिथे शांतता असेल.
कपटी मित्र – चाणक्य म्हणतात तुमचा मित्र ही एक अशी व्यक्ती असते, ज्याच्यावर तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीपेक्षाही जास्त विश्वास ठेवता, मात्र जर असा मित्र घातकी असेल, त्याच्या मनात तुमच्याबद्दल कपट असेल किंवा त्याच्या मनात तुमची प्रगती पाहून मत्सर निर्माण झालं तर असा मित्र तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्हाला धोका देऊ शकतो, त्यामुळे अशा मित्रांपासून नेहमी सावध राहावं.
काम न ऐकणारा नोकर – चाणक्य म्हणतात की तुमचा नोकर तुमचं काम ऐकत नसेल, तुम्हाला उलटी उत्तर देत असेल तर अशा नोकरामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा नोकर कायम तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये आणू शकतो, त्यामुळे अशा नोकराला कामाला ठेवता कामा नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
सापांचं घर – चाणक्य म्हणतात ज्या घरात धोका आहे, अशा घरामध्ये कधीही राहू नये, उदाहरणार्थ ज्या घरात तुमचे गुप्त शत्रू असतील, ज्या घरात तुमच्याविरोधात कट कारस्थान रचली जात असतील, ज्या घरात साप आणि इतर हिंस्त्र प्राण्यांचं वास्तव्य असेल तर अशा घरात तुम्हाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा घरात कधीच राहू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
