Chanakya Niti : मेहनतीशिवाय फळ नाही, चाणक्य यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी असे काही विचार मांडले आहेत, जे आजही अनेकांचं आयुष्य बदलू शकतात.

Chanakya Niti : मेहनतीशिवाय फळ नाही, चाणक्य यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 11:25 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी असे अनेक विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील अनेकांना प्रेरणा देतात. आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवतात. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात जो अनुभव आला, त्या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाकडे जर संयम असेल तर तो त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी साध्य करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

विद्यार्थी दशेत मेहनत – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही विद्यार्थी असता तेव्हा मेहनत ही केलीच पाहिजे, विद्यार्थी असताना तुम्ही जेवढा अधिक अभ्यास कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यात होईल त्यामुळे विद्यार्थी असतानाच्या काळात कधीही आळस करू नका.

संधीचं सोनं करा – चाणक्य म्हणतात संधी ही माणसाच्या आयुष्यात येणारी अशी गोष्ट असते. जी वारंवार तुमच्या आयुष्यात येत नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यात संंधी येते, तेव्हा ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. संधी साधता आली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या हातातील संधीचं सोनं केलं तर तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ज्ञानाशिवाय पर्याय नाही – चाणक्य म्हणतात आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे असलेलं धन एकवेळ नष्ट होऊ शकतं. परंतु तुमच्याकडे असलेलं ज्ञान कधीही नष्ट होऊ शकत नाही. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही आयुष्यात पुन्हा धन कमावू शकता, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आळस – चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे आळसाला माणसानं कायम दूर ठेवलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us