AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याची पाकिस्तानने केली कॉपी, गाणं ऐकून चाहत्यांनी व्यक्त केला संताप

अलका याज्ञनिक यांच्या 31 वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याची पाकिस्तानने केली कॉपी. पाकिस्तानमधील गाणं ऐकून चाहत्यांनी व्यक्त केला संताप.

31 वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याची पाकिस्तानने केली कॉपी, गाणं ऐकून चाहत्यांनी व्यक्त केला संताप
| Updated on: Jun 29, 2026 | 4:32 PM
Share

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर आवाजांपैकी एक म्हणजे अलका याज्ञनिक. 90 च्या दशकात त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांनी संगीतप्रेमींवर जादू केली. त्यापैकीच एक म्हणजे करण अर्जुन या चित्रपटातील ‘मुझको राणा जी माफ करना’ हे गाणे. आजही लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे तितक्याच उत्साहाने वाजवले जाते.

मात्र, या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. पाकिस्तानमध्येही हे गाणे प्रचंड गाजले. त्यानंतर या गाण्याचा पाकिस्तानी चित्रपटासाठी रिमेक करण्यात आला. पण हा रिमेक प्रेक्षकांच्या अपेक्षांवर उतरू शकला नाही. उलट सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली.

1995 मध्ये प्रदर्शित झालेले गाणे आजही सुपरहिट

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या करण अर्जुन या चित्रपटात शाहरुख खान, सलमान खान, काजोल, राखी आणि ममता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा हिट ठरला. या चित्रपटातील ‘मुझको राणा जी माफ करना, गलती म्हारे से हो गई’ हे गाणे अलका याज्ञनिक आणि इला अरुण यांनी गायले होते. या गाण्यामुळे विशेषतः ममता कुलकर्णी यांना मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

पाकिस्तानी चित्रपटात झाला रिमेक

या गाण्याची लोकप्रियता पाहता 2000 साली पाकिस्तानमधील बनारसी चोर या चित्रपटात त्याचा रिमेक करण्यात आला. या चित्रपटात आबिद अली, नरगिस आणि रीमा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

रिमेकचे शीर्षकही जवळपास तेच ठेवण्यात आले. मात्र, मूळ गाण्यातील अनेक गोष्टी बदलण्यात आल्या. संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण एका घरामध्ये करण्यात आले. तसेच खलनायकाच्या हावभावांमध्ये मूळ चित्रपटातील अमरीश पुरी यांच्या अभिनयाची नक्कल करण्याचा प्रयत्न दिसून आला.

रिमेकवर टीकेची झोड

जिथे मूळ गाण्याला आजही ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळतो, तिथे पाकिस्तानी रिमेकला मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. यूट्यूबवर या गाण्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एका नेटकऱ्याने, नक्कल करायची असेल तरी अक्कल लागते अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, “बॉलिवूडमधून गाणं उचललं, पण त्याची पूर्ण वाट लावली असे म्हटले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा