Chanakya Niti : आयुष्यात हे चारच माणसाचे खरे सोबती, कधीच धोका देणार नाहीत, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाजवळ अशा काही गोष्टी असतात, ज्या संकट काळात माणसाची कधीही साथ सोडत नाहीत. संकट काळात याच गोष्टी त्याच्या मदतीला येतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाचं सार थोडक्यात सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर खूप भरोसा असतो, असा व्यक्ती कोणीही असू शकतो, एक तर तो तुमचा मित्र असू शकतो किंवा नातेवाईक देखील असू शकतो. तुम्हाला या व्यक्तीबद्दल पक्की खात्री असते की आयुष्यात काहीही झालं तरी हा व्यक्ती आपली सात सोडणार नाही. मात्र कधी कधी परिस्थिती अशी बनते, की तो व्यक्ती तुमची साथ सोडतो, अशा वेळी तुम्हाला दु:ख होणं सहाजिक आहे. परंतु या जगात अशा चार गोष्टी आहेत, ज्या तुमची आयुष्यात कधीच साथ सोडणार नाहीत, या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एकटे संपूर्ण जगाशी देखील लढू शकता, तुमचा विजय निश्चित आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
ज्ञान – चाणक्य म्हणतात ज्ञान हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे किती ज्ञान आहे? तुम्हाला एखाद्या विषयाची किती माहिती आहे, यावरूनच तुमची ओळख होत असते. जर तुम्ही ज्ञानी असाल तर संपूर्ण समाज तुमचा आदर करतो. तुमच्या शब्दाला या जगात मान असतो. लोकांना देखील तुमचा सहवास हवा असतो. तसेच तुमच्याकडे ज्ञान असेल तर त्या जोरावर तुम्हाला या जगात चांगला रोजगार देखील मिळतो. स्वाभिमानाने तुम्ही जीवन जगू शकता. परंतु जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर मात्र लोक तुमचा कधीही आदर करणार नाहीत. तुमची फसवणूक देखील होऊ शकते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला आयुष्यात कधीही धोका देणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मान-सन्मान – चाणक्य म्हणतात मानसाला जर समाजात प्रतिष्ठा मिळवायची असेल तर प्रचंड कष्ट करावे लागतात. तुमच्यामध्ये समाजाला देण्यासारख्या काही गोष्टी हव्या असतात, तर समाज तुमचा मान-सन्मान करतो. ही एक अशी गोष्ट आहे, जी मानसाचा खरा मित्र असते. अगदी मृत्यूनंतर देखील लोक तुमचं नाव मोठ्या आदराने घेतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
प्रामाणिकपणा – चाणक्य म्हणतात माणसाने आयुष्यात प्रामाणिक असावं, प्रामाणिकपणा तुमची मरेपर्यंत साथ देतो. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर संपूर्ण समाज तुमच्या मदतीला धावून येतो. प्रामाणिकपणाची फळं ही नेहमी गोड असतात, असं चाणक्य यांनी म्हटले आहे.
स्वाभिमान – चाणक्य म्हणतात आयुष्यात स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे. माणासाला कधीही गर्व नसावा, परंतु स्वाभिमान नक्कीच असावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)