Chanakya Niti : परिस्थिती ओळखा शहाणपणाने वागा; चणक्यांच्या या तीन गोष्टी आयुष्यात तुम्हाला अपयशी होऊ देणार नाहीत
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येतं, तेव्हा त्याचं सर्वात मोठं कारण असतं, ते म्हणजे परिस्थितीचा योग्य अंदाज न येणं.चला तर मग आज जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे बचत करावा आणि कुठे खर्च करावा? याबाबत आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे काही विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात आणि योग्य रस्ता दाखवण्याचं काम करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात यश हे नुसतं कष्ट करून कधीही मिळत नाही, तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्मार्ट वर्कची आवश्यकता असते. कष्ट तर सर्वच जण करतात, परंतु प्रत्येकाच्या वाट्याला यश येत नाही, कारण कष्टासोबत तुमच्या प्रयत्नाची दिशा देखील योग्य हवी. तुम्हाला परिस्थिती ओळखता यायला पाहिजे, आणि त्या परिस्थितीनुरू निर्णय घेता आले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
परिस्थिती ओळखा – आर्य चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात चढ-उतार कायम सुरू असतात, त्यामुळे सध्या परिस्थिती काय आहे? आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? या गोष्टीचं आकलन होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर परिस्थितीचं योग्य आकलन झालं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. थोडक्यात काय तर योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आंधळेपणाने विश्वास – चाणक्य म्हणतात तुम्ही आयुष्यात काहीही करत असाल, नोकरी करत असाल, व्यापार करत असाल, तुम्ही तुमच्या कार्य क्षेत्रामध्ये कोणावरही कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, त्यामुळे तुमचा घात होऊ शकतो. कारण कोणती व्यक्ती कशी आहे, हे तुम्हाला माहिती नसतं, अनेक लोक असे असतात, जे आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला धोका देऊ शकतात. तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
भावनावर नियंत्रण ठेवा – चाणक्य म्हणतात आयुष्यात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भवनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकलात तर एक दिवस खूप मोठे व्यक्ती व्हाल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)