Chanakya Niti : याच चार कारणांमुळे माणसाच्या वाट्याला दु:ख येतं, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी दु:खाची काही कारणं सांगितली आहेत. आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : याच चार कारणांमुळे माणसाच्या वाट्याला दु:ख येतं, चाणक्य काय म्हणतात?
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 7:14 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मानवाला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाला दु:ख का होतं? याची काही कारणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात माणूस हा भावना प्रधान प्राणी आहे. काही चांगलं घडलं की त्याला आनंद होतं, तो हसून आपला आनंद व्यक्त करतो. तर त्याच्यासोबत काही वाईट घडलं तर त्याला दु:ख होतं. तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट जर तुमच्या मनासारखी घडली नाही तर तुम्हाला दु:ख होतं. परंतु मानवाच्या प्रत्येक दु:खा मागे चार प्रमुख कारणं आहेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. ही चार कारणं नेमकी कोणती आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

इच्छा – चाणक्य म्हणतात माणसाच्या दु:खाचं सर्वात मोठं कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे इ्च्छा आहे. प्रत्येक माणसाला इच्छा असते. या गोष्टी अशाच घडाव्यात असं त्याला सतत वाटत असतं, मात्र जेव्हा त्या गोष्टी तशा घडत नाहीत, तेव्हा त्याला दु:ख होतं असं चाणक्य म्हणतात.

Loading...

पैसा – चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, जी नेहमी बचत केली पाहिजे, जर तुम्ही पैशांची बचत केली नाही तर हाच पैसा तुम्हाला म्हतारपणात दु:ख देऊ शकतो. कारण तुमच्याकडे जर पैसा असेल तर आणि तरच तुमचं म्हातारपण सुखात जाऊ शकत.

संपत्ती – चाणक्य म्हणतात माणूस आयुष्यभर संपत्ती कमावण्याच्या मागे लागतो. संपत्ती मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो. पुढे हीच संपत्ती त्याच्या दु:खाचं कारण बनते. त्यामुळे माणसाने जास्त संपत्तीची अपेक्षा ठेवू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

संयम – चाणक्य म्हणतात तारुण्यात तुमच्याकडे जर संयम नसेल तर तुम्ही वाईट गोष्टींच्या नादाला लागतात. पुढे चालून याच गोष्टी तुमच्या दु:खाचं कारण बनतात. त्यामुळे प्रत्येकाकडे संयम असायलाच हवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us