
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात. अनेक लोक प्रचंड श्रीमंत असतात. मात्र त्यांच्याकडे जरी पैसा मोठ्याप्रमाणात असला तरी देखील ते समाधानी नसतात. असे लोक पैशांच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतात. मात्र आयुष्यातील आनंद हे लोक कधीच विकत घेऊ शकत नाहीत. असं का होतं? तर असे लोक आयुष्यभर पैशांच्या मागे पळत असतात, अशा लोकांकडे कितीही पैसा असला तरी तो त्यांना कमीच वाटतो. त्यामुळे असे लोक आयुष्यात कधीच आनंदी आणि सुखी होऊ शकत नाहीत. तुलना ही तुमच्या सर्व दु:खाचं मुळ कारण आहे. अनेकदा आपण तुलना करतो, जर एखाद्या व्यक्तीकडे एखादी वस्तू असेल तर ती वस्तू आपल्याला पण हवी असते, त्यामुळे जोपर्यंत आपण ती मिळवत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसू शकत नाहीत, आणि इथेच आपल्या आयुष्याचा आनंद गमावून बसतो असं चाणक्य म्हणतात, त्यामुळे चाणक्य म्हणतात कधीही कोणाशी तुलना करू नका, चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्हाला जर आयुष्यात आनंद पाहिजे असेल तर या गोष्टी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
अध्यात्म – चाणक्य म्हणतात माणूस जेव्हा आपला आनंद आणि सुख गमावून बसतो, प्रचंड संपत्ती असताना देखील त्याचं मन अस्वस्थ असतं, अशा स्थितीमध्ये त्याला केवळ एकच गोष्ट आधार देऊ शकते, ती म्हणजे अध्यात्म. तुम्ही जेव्हा देवाची पूजा करता, प्रार्थना करता. तेव्हा तुम्हाला एक वेगळ्याप्रकारची आत्मिक शांती मिळते, असं चाणक्य म्हणतात. मात्र तुम्ही जेव्हा मनशांती साठी अध्यात्माचा मार्ग निवडता तेव्हा त्या गोष्टी मनापासून करा, तर आणि तरच तुम्हाला तुमच्या जीवनात खरा आनंद मिळू शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
लहान मुलं – चाणक्य म्हणतात जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्याशी प्रेमानेच वागा, ते ऐकत नाही म्हणून मारहाण करणं किंवा त्यांचा सतत राग राग करणं या गोष्टी टाळल्या पाहिजे, जिथे मुलांचा राग केला जातो, तिथे कधीही शांती मिळत नाही. आनंद टिकत नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही इतरांच्या संपत्तीची आस धरता किंवा तुम्ही जेव्हा इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवता, त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यातील आनंद गायब होण्यास सुरुवात होतो. त्यामुळे कधीही दुसऱ्याच्या संपत्तीची आशा ठेवू नका. जे काही कमवायचं आहे, ते कष्टानं कमवा. आयुष्यभर आनंदी राहाल, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
तुलना- चाणक्य म्हणतात आयुष्यात कधीही तुलना करू नका, त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे, आणि माझ्याकडे इतकीच आहे. त्याच्याकडे ही वस्तू आहे, आणि माझ्याकडे नाही. अशी तुलना जेव्हा तुम्ही करता तेव्हा हळुहळु तुमच्या आयुष्यातील आनंद समाप्त होतो. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे, त्यातच समाधानी राहण्यास शिका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)