
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात. चाणक्य यांचे विचार कालबाह्य वाटत नाहीत. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानसानं आदर्श जीव कसं जगावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अशा काही चुका आहे, ज्या जर माणसाने आपल्या आयुष्यात केल्या तर त्याच्या वाट्याला आयुष्यभर कष्टच येतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून माणसानं वाचलं पाहिजे. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माणसाचे काही शत्रू सांगितले आहेत, त्या गोष्टीपासून वाचण्यातच तुमचं हीत आहे, असं चाणक्य म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण?
चाणक्य यांच्या मते आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चाणक्य म्हणतात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट हे केलेच पाहिजे. जर तुम्ही कष्ट टाळत गेलात तर एक दिवस तुम्ही फार मोठ्या संकटात सापडात, त्यावेळी परतीचे तुमचे सर्व मार्ग हे बंद झालेली असतील. त्यामुळे आयुष्यात कष्ट केलेच पाहिजे.
चाणक्य यांनी याासठी काही उदारहण देखील दिले आहेत, चाणक्य म्हणतात जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या विद्यार्थी दशेत तुम्ही आभ्यास नाही केल तर एक वेळ अशी येते की, तुम्ही परीक्षेत पास होऊ शकत नाही. जर तुम्ही ज्ञानार्जनच केलं नाही तर तुम्ही जेव्हा मोठे होतात, तेव्हा तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. तसेच पुढे चाणक्य असं देखील म्हणतात हे नोकरदार वर्गाच्याबाबतीत देखील लागू होतं, नोकरदार वर्गानं आपल्या कामात कधीही आळस करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)