Chanakya Niti : हे लोक असतात खूपच घातक, त्यांच्याशी कधीच मैत्री करू नका
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात मैत्री इतकी दुसरी सुंदर गोष्ट कोणतीच नाही, मात्र जेव्हा आपण चुकीच्या व्यक्तीसोबत मैत्री करतो, तेव्हा नक्कीच आपल्यावर पश्चातापाची वेळ येते.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित जवळपास सर्व गोष्टींवर लिखाण केलं आहे. मैत्री हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. आपण आपल्या आयुष्यात अनेकांसोबत मैत्री करतो, काही लोकांसोबत केलेली मैत्री आयुष्याच्या शेवटपर्यंत टीकते, चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ते म्हणतात मैत्री ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मात्र जेव्हा आपण चुकीच्या माणसांसोबत मैत्री करतो, तेव्हा आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे मैत्री ही नेहमी जपून करावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. मैत्री कोणासोबत करू नये, याबाबत चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयात.
सतत खोटं बोलणारी माणसं – चाणक्य म्हणतात जी लोक सतत खोटं बोलतात ते लोक मैत्रीच्या योग्यतेचे नसतात. ते त्यांच्या सवयीप्रमाणे तुमच्यासोबत देखील खोटंच बोलतात त्यामुळे तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता असते, त्यांच्या खोटेपणामुळे तुम्ही देखील संकटात सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नका.
स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, त्यांच्यासोबत चुकूनही मैत्री करू नये, कारण असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमचाही बळी द्यायला मागे -पुढे पहात नाही, अशा लोकांशी केलेली मैत्री ही नेहमी नुकसानच करते, त्यामुळे अशा लोकांना आपल्या जवळपास देखील फिरकू देऊ नये, अशा लोकांपासून कायम सावध राहावं.
प्रचंड रागीट लोक – चाणक्य म्हणतात अशा लोकांसोबत तर मैत्रीच करू नये, कारण या लोकांना कधी राग येईल, आणि कधी ते रागाच्या भरात तुमच्यावर हल्ला करतील हे सांगता येत नाही, यांच्यासोबत मैत्री केल्यामुळे तुमचा जीवही संकटात सापडू शकतो, त्यामुळे अशा लोकांशी मैत्री टाळावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच अंहकारी लोकांसोबत देखील मैत्री करू नये असं चाणक्य सांगतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
