Chanakya Niti : संसाराचं वाटोळं का होतं? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात आपण आयुष्यात अशा काही चुका करतो, त्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : संसाराचं वाटोळं का होतं? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी
CHANKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 9:42 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श जीवन कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात यश अपयश येतच राहतं. परंतु तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका, संयम हेच तुमच्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे.चाणक्य या आपल्या ग्रंथामध्ये विवाहित पुरुषांनी संसार कसा करावा, काय करावं आणि कोणत्या चुका टाळाव्यात? एका जोडीदाराच्या दुसऱ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा असतात, याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी हे दोघं संसाररूपी रथाची दोन चाकं असतात. आता विचार करा एखाद्या रथाचं एखादं चाक खराब झालं किंवा ते मागं पडले तर तो रथ धावू शकेल का? तर नाही. त्याच प्रमाणे पती-पत्नीचं देखील असतं. जोपर्यंत दोघेही एकमेकांना पुरक असतात. दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो, तोपर्यंत संसार व्यवस्थित चालतो. मात्र जर विश्वास डळमळीत व्हायला लागला तर मग मात्र असा संसार फार काळ टिकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विश्वास – चाणक्य म्हणतात जोपर्यंत पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास असतो, तोपर्यंत संसार सुरळीत चालतो. मात्र ज्या दिवशी पती-पत्नीचा एकमेकांवरील विश्वास कमी होतो. नात्यामध्ये संशय निर्माण होतो, तेव्हा मात्र घरामध्ये सातत्याने भांडणं होऊ लागतात, आणि लवकरच असा संसार उद्ध्वस्त होतो.

जबाबदारी – चाणक्य म्हणतात संसारामध्ये प्रत्येकाची एक विशिष्ट जबाबदारी ठरलेली असते. पतीच्या काही जबाबदाऱ्या असतात तशाच पत्नीच्या देखील काही जबाबदाऱ्या असतात. प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. जर दोन्ही पैकी एकजण जरी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसेल तर असा संसार फार काळ टिकत नाही.

प्रेम – चाणक्य म्हणतात कुठल्याही नात्याची भिस्त ही प्रेमावरच असते. जर पती-पत्नीच्या नात्यात प्रेम नसेल, घराची ओढ नसेल तर असं नातं फार काळ टिकत नाही, परंतु जर पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम असेल तर असं नातं दीर्घ काळ टिकतं. असे पती-पत्नी आयुष्यभर एकमेकांची साथ सोडत नाहीत.

अपेक्षा – चाणक्य म्हणतात प्रत्येकाला आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करतात, तेव्हा पती-पत्नीच्या नात्यामधील गोडवा टिकून राहतो, आणि संसार सुरळीत होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us