
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी कौटुंबीक नातेसंबंधांबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जस की वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? आदर्श मुलगा कोणाला म्हणावं? आदर्श पती-पत्नीची लक्षणं काय आहेत? आई -वडिलांनी आपल्या मुलांवर कशापद्धतीने संस्कार करावेत? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पती-पत्नीच्या नात्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य म्हणतात पती-पत्नीच्या वयात जास्त अतर नसावं, त्याची अनेक कारणं चाणक्य यांनी सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी ही संसाराची दोन चाक असतात, ती दोन्ही समान गतीनं धावली पाहिजेत तर संसाराचा रथ हा व्यवस्थित वेग घेत राहतो. प्रगती होत राहते. मात्र जर पतीचं वय हे पत्नीपेक्षा खूप जास्त असेल तर असा संसार फार काळ टिकेलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. कारण त्या दोघांच्या विचारांमध्ये मोठा फरक असतो. वयानं मोठा असलेला पती याचे विचार हे वेगळे असतात, तर वयानं लहान असलेल्या पत्नीचे विचार हे वेगळे असतात, त्यांच्या विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे असे नाते फार काळ टिकत नाही, त्यामुळे कधीही वृद्ध व्यक्तीने तरुणी मुलीशी लग्न करू नये.
चाणक्य आणखी एक महत्त्वाचं कारण हे देखील सांगतात, की संसार म्हटलं की जबाबदारी ही आलीच, जर एखाद्या वयानं खूप मोठ्या असलेल्या व्यकीने एखाद्या वयानं लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं तर तो आयुष्यभर तीची जबाबदारी घेऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संसार हा कोलमडून पडतो, तसेच जर पती-पत्नीच्या वयात जास्त अतंर असेल तर असं जोडपं समाजात देखील निंदेचा विषय बनतं असं चाणक्य सांगतात.
चाणक्य म्हणतात लग्न करताना पती हा पत्नीपेक्षा फार तर फार दोन ते तीन वर्षांनी मोठा असावा, कारण ते समवयस्कर असल्यामुळे असे नातेसंबंध दीर्घकाळ टिकतात. तसेच पती हा पत्नीपेक्षा थोडा मोठा असल्यानं त्याला सर्व जबाबदाऱ्यांची जाणीव देखील असते, त्यामुळे संसार सुरळीत चालतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)