Chanakya Niti : ज्यांच्यामध्ये असतात हे सात गुण, असेच पुरुष महिलांना जास्त आवडतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श पुरुषांची लक्षणं सांगितली आहेत.

Chanakya Niti : ज्यांच्यामध्ये असतात हे सात गुण, असेच पुरुष महिलांना जास्त आवडतात
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 28, 2025 | 11:23 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये पुरुषांचे असे सात गुण सांगितले आहेत, जे गुण त्याला आदर्श बनवतात, पुरुषांमध्ये असलेल्या या सात गुणांमुळे महिलांना त्या पुरुषाबद्दल आदर वाटतो, आज याच सात गुणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रामाणिकपणा – आर्य चाणक्य म्हणतात कोणतीही महिला पुरुषामध्ये जर सगळ्यात आधी काय शोधत असेल तर तो म्हणजे प्रामाणिकपणा, कारण प्रत्येक महिला आपल्या होणाऱ्या लाईफ पार्टनकडून किंवा पतीकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असते.

आदर – स्त्रीयांना असे पुरुष आवडतात जे दुसऱ्याचा आदर करतात, कधीही त्यांना दुखावत नाहीत. आदर ही एक अशी गोष्ट आहे, जेवढा तुम्ही दुसऱ्याचा आदर कराल तेवढाच जगात तुमचाही आदर होईल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संयम –  आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर चढ- उतार सुरूच असतात, मात्र आयुष्यात वादळ आले असताना देखील जे पुरुष त्याचा संयमानं सामना करतात अशा कुठल्याही पुरुषांबद्दल स्त्रीला आदर वाटतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ध्येय स्पष्ट असणारा – चाणक्य म्हणतात आयुष्य जगत असताना तुमची ध्येय-धोरणं स्पष्ट असली पाहिजेत, तरच तुम्हाला यश मिळू शकतं, ज्यांची ध्येय स्पष्ट आहेत अशा पुरुषांचा महिलांवर अधिक प्रभाव पडतो.

स्वच्छता – चाणक्य म्हणतात जो माणूस साधा पण टापटीप राहातो, ज्याचं राहाणीमान स्वच्छ आहे, असे पुरुष स्त्रीयांवर जास्त प्रभाव पाडतात.

विनोदी मात्र, मर्यादा पाळणारा – चाणक्य म्हणतात महिलांना विनोदी पुरुष आवडतात, मात्र त्यामध्ये एक निश्चित अशी मर्यादा असली पाहिजे.

भावनात्मक पातळीवर सशक्त  – आर्य चाणक्य म्हणतात  जे पुरुष भावानात्मक पातळीवर अधिक सशक्त असतात अशा पुरुषांना स्त्रीया पसंत करतात. आपला लाईफ पाटर्नर हा भावनात्मक पातळीवर सशक्त असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)