चाणक्य म्हणतात, ‘या’ 6 गोष्टी कधीच उद्यावर ढकलू नका, सर्वकाही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही!
आचार्य चणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. ज्यामध्ये आज काय करायला पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. तर चाणक्य असं देखील सांगतात 'या' 6 गोष्टी कधीच विसरु नका... नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होईल...

कोणती गोष्ट कधी करायला पाहिजे याबद्दल आपल्याला कधी कळत नाही आणि आजची गोष्ट आपण उद्यावर ढकलून देते… तर याबद्दल देकील चाणक्या यांनी महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत. चाणक्य हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान, रणनीतिकार आणि तत्त्वज्ञ आहेत. त्यांची तत्त्वे आजच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. चाणक्याच्या मते, वेळ ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. जे योग्य वेळी योग्य गोष्टी करतात, त्यांनाच जीवनात यश आणि सन्मान मिळतो. जे महत्त्वाच्या गोष्टी पुढे ढकलतात, त्यांचे आयुष्य हळूहळू संघर्ष आणि अपयशांनी भरून जाते. काही गोष्टींना विलंब करणं म्हणजे थेट विनाशाला आमंत्रण देण्यासारखं आहे… असं चाणक्या म्हणतात, तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी…
शिक्षण : चाणक्य नीतीनुसार, ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. चाणक्य नीती सांगते की, जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर शिक्षण घेतलं नाही, तर त्याला आयुष्यात पुढे त्रास सहन करावा लागेल.
विवाह : विवाह हा आणखी एक विषय आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की विवाह योग्य वयातच झाला पाहिजे. विवाह खूप उशिरा केल्याने केवळ सामाजिक समस्याच वाढत नाहीत, तर मानसिक आणि कौटुंबिक अडचणीही वाढतात.
मुलांचा जन्म : नीतिशास्त्रानुसार, मुलांचा जन्मही वेळेवर झाला पाहिजे. ते विनाकारण पुढे ढकलल्यास पुढे आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
कर्ज परतफेड : चाणक्याचा असा विश्वास होता की कर्ज कधीही पुढे ढकलू नये. कर्ज फेडण्यास विलंब केल्यास, ते आयुष्यभर एक मोठं ओझं बनेल आणि तुमच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवेल.
वाईट गोष्टी आणि वाईट सवयी नष्ट करणे : जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात किंवा समाजात एखादी वाईट सवय, दुष्टता दिसली, तर तुम्ही ती सुरुवातीलाच दूर केली पाहिजे. ती दूर करण्यास उशीर केल्यास पुढे मोठे अनर्थ ओढवू शकतात.
धर्म आणि सत्कर्म : चाणक्य नीतीनुसार, पुण्यकर्मे आणि धार्मिक कार्ये कधीही पुढे ढकलू नयेत. चाणक्य आपल्याला आठवण करून देतात की, एकदा संधी हुकली की नंतर पश्चात्ताप होतो आणि आयुष्य अपूर्ण राहते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)