दीपावलीला चतुर्ग्रही योग, या 5 राशींवर होणार माता लक्ष्मीची विशेष कृपा

यंदा दिवाळी आणखी खास असणार आहे. यावेळी दिवाळीच्या दिवशी चार ग्रहांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योग बनणार आहे. दिवाळीच्या दिवशी सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र एकत्र तूळ राशीमध्ये येणार आहेत. या कारणामुळे दिवाळी तमाम राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे.

दीपावलीला चतुर्ग्रही योग, या 5 राशींवर होणार माता लक्ष्मीची विशेष कृपा
दीपावलीला चतुर्ग्रही योग, या 5 राशींवर होणार माता लक्ष्मीची विशेष कृपा
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 6:41 PM

मुंबई : कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला दीपावली साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते. मान्यता आहे की जो भक्त श्रद्धा आणि भक्तीसह त्यांची पूजा आणि ध्यान करतो, त्याच्यावर मातारानी आपली कृपा जरूर करते. त्या कुटुंबात धन धान्याची कुठलीच कमी नसते. यंदा दिवाळी आणखी खास असणार आहे. यावेळी दिवाळीच्या दिवशी चार ग्रहांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योग बनणार आहे. दिवाळीच्या दिवशी सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र एकत्र तूळ राशीमध्ये येणार आहेत. या कारणामुळे दिवाळी तमाम राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. (Chaturgrahi Yoga on Diwali, special grace of Mother Lakshmi will be on these 5 zodiac signs)

मिथुन राशी

मिथुन राशीच्या पाचव्या घरात चतुर्ग्रही योग राहील. मिथुन राशीच्या लोकांसाठी ही स्थिती खूप फायदेशीर ठरेल. या दरम्यान बौद्धिक विकास होईल आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे. हा चतुर्ग्रही योग शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी अधिक लाभदायक ठरेल.

कर्क राशी

कर्क राशीच्या चौथ्या घरात चतुर्ग्रही योग तयार होईल. यातून धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. माता लक्ष्मी तुमच्यावर अपार आशीर्वाद देईल आणि वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर आता तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो.

कन्या राशी

तुमच्या दुसऱ्या घरात हा योग तयार होत आहे, अशा स्थितीत मान-प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. करिअर संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचा आवाज अधिक प्रभावी होईल.

धनु राशी

धनु राशीच्या अकराव्या घरात हा योग तयार होईल. अशा स्थितीत गुंतवणुकीत भरपूर नफा अपेक्षित आहे. तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असाल तर चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. या दिवाळीत तरुणांना त्यांच्या मोठ्यांकडून अनेक सरप्राईज आणि भेटवस्तू मिळू शकतात.

मकर राशी

मकर राशीच्या दहाव्या भावात चार ग्रहांचा संयोग होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमधील अडथळे दूर होतील. तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ त्यासाठी योग्य आहे. (Chaturgrahi Yoga on Diwali, special grace of Mother Lakshmi will be on these 5 zodiac signs)

इतर बातम्या 

Video: श्रीदेवीच्या नवराई माझी लाडाची वर आजीबाईंचे ठुमके, नेटकरी म्हणाले, नाचायला वयाचं बंधन नसतं!

मानवतेच्या दृष्टीनं विचार करा, वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना 2 संधी द्या, संभाजी छत्रपतींचं उद्धव ठाकरेंना पत्र