AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानवतेच्या दृष्टीनं विचार करा, वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना 2 संधी द्या, संभाजी छत्रपतींचं उद्धव ठाकरेंना पत्र

राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली आहे.

मानवतेच्या दृष्टीनं विचार करा, वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना 2 संधी द्या, संभाजी छत्रपतींचं उद्धव ठाकरेंना पत्र
संभाजी छत्रपती उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 6:03 PM
Share

मुंबई: राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली आहे. कोरोनामुळं दोन वर्ष जाहिरात निघाली नाही, काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षांचे अर्ज करता येत नाहीत, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलंय.

प्रति, मान.श्री. उद्धव ठाकरे जी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-32

विषय: स्पर्धा परीक्षा उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी वाढीव 2 संधी मिळणेबाबत

माननीय महोदय,

वरील विषयास अनुसरून आपणांस विनंती करण्यात येते की, कोविड -19 मुळे मागील 2 वर्षात नोकर भरती साठी नवीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात न आल्याने खुल्या गटासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनी आपली वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांनाआता नुकत्याच MPSC द्वारे नवीन जाहिराती प्रसिद्ध होत असलेल्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाही.

हे उमेदवार मागील 3 ते 4 वर्षांपासून सरकारी नोकरी साठी अभ्यास करीत आहे. मागील 2 वर्षात जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असल्याने त्यांची परीक्षा देण्याची संधी ह्या उमेदवारांची काही चूक नसताना हिरावून घेतली जात आहे.

यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून यांना 2 वाढीव संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. यात सर्वात जास्त नुकसान हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे झाले आहे.

देशातील विविध राज्यांनी देखील उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना 2 संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती.

कळावे,

आपला

संभाजी छत्रपती

इतर बातम्या:

सफरचंदाच्या शेतीला आता केंद्र सरकारचेही प्रोत्साहन, उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत

शेतकऱ्यांना लुटलं तर सरकारपुढं हातपाय जोडणार नाही, थेट कोर्टात जाणार, भाजप खासदार वरुण गांधींचा योगी सरकारलाच इशारा

Sambhaji Chhatrapati wrote letter to Uddhav Thackeray to gave two more chance to students for appear MPSC exam who agebar due to corona time

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.