AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 7 May 2022 : जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात,व्यक्तीमत्वाचे आणि व्यवहार ज्ञानाचे समाजात कौतुक होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

Horoscope 7 May 2022 : जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात,व्यक्तीमत्वाचे आणि व्यवहार ज्ञानाचे समाजात कौतुक होईल
| Edited By: | Updated on: May 07, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष –

आज तुम्ही सामाजिक कार्यापेक्षा तुमच्या दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्हाला महत्वाच्या गोष्टी उपलब्ध होतील. कुटूंबातील काही समस्या दूर झाल्याने घरातील वातावरण सुखमय व आनंदी राहिल.

मुलांच्या ऍडमिशनमुळे थोडी चिंता असेल. अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना कोणत्याच गोपनीय गोष्टी लगेच सांगु नका. असं केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

व्यवसायिक कामकाज सामान्यच असेल. पण, पगार वेळेवर मिळत राहिल. ज्याने आर्थिक परिस्थिती व्यवस्थित राहिल. नोकरदार व्यक्तींना त्याच्या अधिकाऱ्यांकडून कामात काही बदल करण्याचे आदेश येऊ शकतात.

लव फोकस – जोडीदाराची तुमच्या कामात पूर्ण साथ राहिल. काही वेळ मनोरंजन आणि मौजमस्तीत जाईल. खबरदारी – जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. औषधं वेळेवर घ्या. शुभ रंग – आकाशी भाग्यवान अक्षर – प अनुकूल क्रमांक – 2

वृषभ –

मालमत्ते संबंधित महत्वाची कामे होण्याची दाट शक्यता. तुमच्या व्यक्तीमत्वाचे आणि व्यवहार ज्ञानाचे समाजात कौतुक होईल. तुमचा मान संन्मान वाढेल. विद्यार्थ्याचे लक्ष अभ्यासात लागेल.

आज विनाकारण फिरण्यावर वेळ वाया घालवू नका. कारण आळस आणि मज्जा मस्तीमुळे काही महत्वाची कामे आर्धवट राहू शकतात. तरूण मुलांना त्यांच्या करिअर बाबत चिंता राहतील.

कामाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. सहकाऱ्यांच्या सल्ल्यांवर देखील विचार करा. दिवसाचा बराचसा वेळ बाहेरच्या कामात निघून जाईल.

लव फोकस – वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रेमप्रकरणात मर्यादा ठेवा.

खबरदारी – सर्वाइकल आणि खांद्याचे दुखणे यासारख्या शारिरीक तक्रारी राहतील. व्यायाम आणि योगावर आधिक भर द्या.

शुभ रंग – निळा भाग्यवान अक्षर – म अनुकूल क्रमांक – 1

मिथुन –

आज ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. वेळेचा आदर करा. तुम्ही व्यवसाय आणि कुटूंब दोन्हीमध्ये योग्य सामतोल राखाल. आर्थिक परिस्थिती वरून थोडं टेंशन असेल. घराच्या देखभाली वरून खर्च केल्याने बजेट बिघडू शकते. जवळच्य व्यक्ती सोबत कोणत्यातरी लहान कारणावरून वाद विवाद होण्याची शक्यता.

कामच्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमुळे, काही बदल करण्यासाठी तुम्ही काही योजना आखल्या आहेत, त्यावर पूर्ण लक्ष द्या. कारण लवकरच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.

लव फोकस – जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घेणं तुमचं कर्तव्य आहे. एकमेकांच्या सहवासाने आपापसातील संबंध अधिक चांगले होतील.

खबरदारी – कामच्या अधिक व्यापाने मानसिकरित्या थकवा येईल. योगा आणि ध्यानासाठी वेळ द्या.

शुभ रंग – केसरी भाग्यवान अक्षर – र अनुकूल क्रमांक – 5

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....