AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाला अर्पण करण्यासाठी ही 2 फळे सगळ्यात शुद्ध आणि पवित्र मानली जातात; 99 % लोकांना माहित नसेल

कोणत्याही देवाची पूजा करताना देवाच्या चरणी फळे अर्पण करणे हे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की सर्व फळांमध्ये अशी दोन फळे आहेत ज्यांना सर्वात शुद्ध आणि पवित्र मानलं जातं. ही दोन फळे देवाला अर्पण करणे सगळ्यात जास्त पवित्र मानलं जातं. कोणती आहेत ही दोन फळे?

देवाला अर्पण करण्यासाठी ही 2 फळे सगळ्यात शुद्ध आणि पवित्र मानली जातात; 99 % लोकांना माहित नसेल
Purest Fruits for Hindu Offerings: Coconut & Banana Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 06, 2025 | 12:22 AM
Share

कोणत्याही देवाची पूजा करताना देवासमोर नेहमी फळे ठेवली जातात. कारण नैवद्याप्रमाणेच फळे देखील पूजेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की फळांमध्ये देखील अशी दोन फळे आहेत जी देवाला अर्पण करण्यासाठी सर्वात शुद्ध मानली जातात.

ही दोन फळे आहेत…

ही दोन फळे म्हणजे नारळ आणि केळी. होय या दोन फळांना पूजेत विशेष स्थान आहे. जसं की दुर्गा देवीच्या पूजेत किंवा कोणत्याही देवीची पूजा करताना नारळ सर्वात जास्त अर्पण केला जातो. दुसरीकडे, भगवान विष्णूच्या पूजेत केळी अर्पण करणे आवश्यक आहे. खरं तर, कोणत्याही देवाच्या पूजेत ही दोन्ही फळे सर्वात शुद्ध मानली जातात. यामागे कारण आहे ते ही दोन्ही फळे वाढवण्याची पद्धत.

फळांचे धार्मिक महत्त्व काय आहे?

केळी हे पवित्र आणि शुद्ध फळ मानले जाते कारण त्याच्या झाडाचा प्रत्येक भाग वापरण्यायोग्य असतो. केळीचे पान, देठ, फूल आणि फळ. केळीच्या झाडाला हिंदू धर्मात कल्पवृक्ष म्हणतात. सर्व इच्छा पूर्ण करणारे झाड. नारळाचे फळ देवाला अर्पण केल्यानंतर ते फोडले जाते. याचा अर्थ असा की आपण आपला बाह्य अहंकार काढून टाकत आहोत आणि आपले अंतर्मन देवाला समर्पित करत आहोत.

हे फळ भगवान शिवाचे रूप मानले जाते.

नारळावरील तीन डोळे भगवान शिवाच्या तीन डोळ्यांशी संबंधित असतात असं म्हटलं जातं. हे फळ भगवान शिवाचे रूप मानले जाते. म्हणूनच भगवान शंकरांना देखील नारळ अर्पण केला जातो आणि प्रत्येक पूजेमध्ये नारळ ठेवला जातो.

ही दोन फळे अर्पण करण्यामागील कारणे

केळी आणि नारळ ही दोन फळे आहेत जी खाल्ल्यानंतर फेकून दिल्यास पुन्हा वाढत नाहीत. साधारणपणे, सर्व फळांमध्ये बिया असतात. जर ते खाल्ले आणि फेकून दिले तर झाड पुन्हा वाढते. पण जर केळी किंवा त्याची साल फेकून दिली तर त्यापासून पुन्हा कोणतेही झाड वाढत नाही.

दोन्ही फळे मुक्ती किंवा मोक्ष दर्शवतात

जर नारळ फोडून फेकून दिला तर त्याच्या फळांपासून किंवा सालींपासून कोणतेही झाड वाढत नाही. ही दोन्ही फळे मुक्ती किंवा मोक्ष दर्शवतात. म्हणून, ही दोन फळे अर्पण करून, व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करतो असं त्याचा अर्थ मानला जातो.

म्हणून यांना शुद्ध फळे म्हटलं जातं 

सहसा जेव्हा आपण कोणतेही फळ खातो तेव्हा त्याचे बी फेकून दिले जाते. किंवा पक्षी या बिया खातात आणि त्यांच्या विष्ठेतून त्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी रुजल्या जातात ज्यामुळे झाडे तयार होतात. पण केळी आणि नारळ ही अशी फळे आहेत जी बियांपासून वाढत नाहीत. केळीला देठाद्वारे लावावे लागते आणि नारळ संपूर्णपणे लावावा लागतो. आणि तेव्हाचे त्यांची रोपे येतात. म्हणून, ही फळे शुद्ध मानली जातात.

ऋग्वेदातही उल्लेख सापडतो

केळी आणि नारळ यांचा ऋग्वेदात देखील उल्लेख आहे. जो सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. त्यामुळे कुठे तरी तेव्हापासूनच या दोन फळांना विशेष महत्त्व आहे. म्हणून ही दोन्ही फळे देवाला अर्पण करण्यासाठी सर्वात शुद्ध आणि पवित्र मानली जातात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...