Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

| Updated on: Mar 27, 2021 | 8:57 PM

शब-ए-बारात हा असा ज्यामध्ये अल्लाहकडे प्रार्थना केली तर सगळे गुन्हे माफ होतात, अशी मान्यता आहे. या वर्षीचा शब-ए-बारात 28 ते 29 मार्च या कालावधित साजरा केला जाईल. (muslim religion festival Shab-e-Barat)

Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
सांकेतिक फोटो
Follow us on

Shab-e-Barat 2021: मुस्लीम समाजात अनेक सण, उत्सव आनंदात साजरे केले जातात. यापैकीच एक सण म्हणजे शब-ए-बारात.  हा असा सण आहे; ज्यामध्ये अल्लाहकडे प्रार्थना केली तर सगळे गुन्हे माफ होतात, अशी मान्यता आहे. या वर्षीचा शब-ए-बारात 28 ते 29 मार्च या कालावधित साजरा केला जाईल. या दोन दिवशी मुस्लीम बांधव रात्रभर घर किंवा मशिदीमध्ये जाऊन प्रार्थना (Prayers In Mosques) करतात. तसेच, स्मशानभूमीमध्ये (Cemeteries) जाऊन आपल्या पूर्वजांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात. इस्लामिक दिनदर्शिकेप्रमाणे शब-ए-बरात हा सण शाबान महिन्याच्या 14 आणि 15 तारखेला साजरा केला जातो. (detail information of Muslim religion festival Shab-e-Barat date and its celebration method in Marathi)

सर्व गुन्ह्यांपासून मिळते माफी

मुस्लीम धर्मामध्ये शब-ए-बरात या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्यास्त झाल्यानंतर हा सण साजरा केला जातो. यावेळी मुस्लीम बांधव आणि भगिनी स्वत:च्या भरभराटीसाठी प्रार्थना करतात. तसेच, यावेळी आतापर्यंत झालेल्या सर्व गुन्ह्यांची माफीसुद्धा या सणामध्ये मागितली जाते. या दिवशी जर प्रार्थना केली तर अल्लाह आपले सगळे गुन्हे माफ करतो, अशी मान्यता असल्यामुळे अल्लाहकडे माफी मागितली जाते.

घर, मशिदीमध्ये रोषणाई

शब-ए-बारात सणाला विशेष महत्त्व असल्यामुळे मुस्लीम समाजामध्ये हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी मशिदी, स्मशानभूमी यांच्यावर आकर्षक अशी रोषणाई केली जाते. सर्व गुन्ह्यांपासून मुक्ती मिळण्याची रात्र असल्यामुळे शब-ए-बारातमध्ये देवाकडे प्रार्थना केली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या समाधीवर जाऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दलसुद्धा माफी मागितली जाते.

मुस्लीम समाजातील चार पवित्र रात्रींपैकी शब-ए-बारात ही सुद्धा एक पवित्र रात्र असल्याची मान्यता आहे. आशूरा ची रात, शब-ए-मेराज, शब-ए-कद्र, शब-ए-बारात अशा या चार पवित्र रात्री आहेत. शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधावांच्या घरामध्ये बिर्याणी, कोरमा अदी स्वादिष्ट आणि रुचकर जेवण तयार केलं जातं. तसेच पाहुण्यांच्या पाहुणचारासोबतच गरिबांनासुद्धा जेवण दिलं जातं.

इतर बातम्या :

तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको; राज्यातील जमावबंदीला भाजपचा विरोध

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

पूजा चव्हाणनंतर आणखी एका आत्महत्येप्रकरणी संजय राठोड चर्चेत, कारण काय?

(detail information of Muslim religion festival Shab-e-Barat date and its celebration method in Marathi)