Diwali 2022: कोण होती श्रीरामाची बहीण? रामायणात का नाही तिचा उल्लेख?

| Updated on: Oct 21, 2022 | 7:50 PM

रामायणात श्रीराम आणि त्यांच्या तीन भावांबद्दल उल्लेख आढळतो. मात्र श्रीरामाला एक बहीणसुद्धा होती. अनेकांना तिच्याबद्दल माहिती नाही .

Diwali 2022: कोण होती श्रीरामाची बहीण? रामायणात का नाही तिचा उल्लेख?
श्रीरामाची बहीण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, 14 वर्षांचा वनवास भोगून भगवान राम (Bhagwan Ram) अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी या आनंदात संपूर्ण शहर दिव्यांनी (Diwali In Ayodhya) सजवले होते. तेव्हापासून दिवाळी (Diwali 2022) हा दिव्यांचा सण साजरा केला जात असल्याचे सांगितले जाते. रामायणात (Ramayana) राजा दशरथाच्या चार पुत्रांचा उल्लेख आहे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. फार कमी लोकांना माहित आहे की भगवान रामाला  एक बहीण देखील होती. वाल्मिकीं ऋषींनी लिहिलेल्या रामायणात याचा कुठेही उल्लेख नाही.

दक्षिण भारतातील रामायणानुसार भगवान श्रीरामांच्या बहिणीचे नाव शांता होते. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्याची थोरली मुलगी होती. शांता लहानपणापासूनच गुणांनी परिपूर्ण होती. ती वेद आणि शिल्पकलेत निपुण होती. तथापि, दशरथ राजाने बालपणीच शांताला अगदेशचा राजा रोमपाद याला दत्तक दिले होते.  राजा रोमपादची बहीण वर्षािणी ही कौशल्याची बहीण आणि शांताची मावशी होती.

दशरथ राजाने शांताला का दत्तक दिले?

एकदा राजा रोमपाद आणि त्याची पत्नी वर्षिणी राजा दशरथ आणि कौशल्या यांना भेटण्यासाठी अयोध्येला गेले. राजा रोमपाद आणि वर्षािणीला मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी राजा दशरथ आणि त्यांच्या पत्नीला मुलगी शांत हिला दत्तक देण्याची विनंती केली. मुलगी असल्याने शांताला रघुकुलाची गादी सांभाळण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे राजा दशरथ शांताला दत्तक देण्यास  तयार झाले. याशिवाय कौशल्याला आपल्या बहिणीला निराश करून स्वतःच्या दारावरून परत पाठवायचे नव्हते म्हणून तिने देखील शांताला दत्तक देण्याचे मान्य केले आणि अशा प्रकारे शांता अंगदेशची राजकुमारी बनली.

हे सुद्धा वाचा

शांताचे लग्न कोणासोबत झाले?

एकदा राजा रोमपाद शांतासोबत गप्पा मारण्यात व्यस्त होता. तेवढ्यात एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात आला आणि त्याने पावसाळ्यात शेताशी संबंधित समस्या त्यांच्यासमोर ठेवली. मात्र  राजा रोमपादने त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. दुखावलेल्या ब्राह्मणाने रागाने राज्य सोडले. इंद्रदेव गरीब ब्राह्मणाचा हा अपमान सहन करू शकले नाहीत आणि त्यांच्या क्रोधामुळे अंगदेशात दुष्काळ पडला.

या घटनेने राजा रोमपाद खूप अस्वस्थ झाला. राजा रोमपाद ऋषी ऋृंगकडे गेला आणि दुष्काळग्रस्त राज्याला पुन्हा हिरवेगार  करण्याचा मार्ग विचारला. ऋृंग ऋषींनी सांगितलेल्या उपायांमुळे अंगदेश पुन्हा दुष्काळमुक्त झाला.  यावर प्रसन्न होऊन राजा रोमपादने आपली दत्तक मुलगी शांता हिचा विवाह ऋषी ऋृंगसोबत लावला.

रामायणात शांताचा उल्लेख का नाही?

रामायणात राजा दशरथाच्या चारच मुलांचा उल्लेख आहे. त्यांची मुलगी शांताचा कुठेही उल्लेख नाही. असे म्हणतात की शांता मुलगी असल्यामुळे रघुकुलाचे सिंहासन संभाळण्यायोग्य नव्हती. त्याकाळी सिंहासनाचा मान हा मोठ्या मुलाचा असायचा.  दुसरे कारण म्हणजे, कौशल्याची बहीण वर्षीनी निपुत्रिक होती, म्हणून राजा दशरथ आणि कौशल्याने त्यांची मुलगी शांता वर्षीनीकडे दत्तक दिली. रामायणात शांताचा उल्लेख नाही कारण ती बालपणीच अयोध्या सोडून अंगदेशला गेली होती.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)