अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नका, असं का सांगितलं जातं? चूक केली तर काय होतं?

मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मागे वळून पाहू नये, असे म्हटले जाते. मागे वळून पाहिल्यास मोठं अघटित घडू शकतं, असं सांगितलं जातं.

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नका, असं का सांगितलं जातं? चूक केली तर काय होतं?
सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य मेटा एआय
| Updated on: Jun 25, 2025 | 8:23 PM

जीवन आणि मृत्यूचं चक्र अटळ आहे. या पृथ्वीतलावर जन्मलेला प्रत्येक सजिवाचा मृत्यू होतोच. हिंदू धर्मात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे काही नियम आहेत. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी या विधींचेपालन केले जाते. अंत्यसंस्कार केल्यानंतर निघून जाताना मागे वळून पाहू नये, असे म्हटले जाते. मात्र असे नेमके का म्हटले जाते? शास्त्रात नेमके काय सांगण्यात आलेले आहे, हे जाणून घेऊ या…

…नंतर मृतदेहाला चितेवर ठेवावे

मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मागे वळून पाहू नये, असे नेहमी सांगितले जाते. याबाबत गरुड पुराणात सांगण्यात आले आहे. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याआधी पवित्र आणि नवे वस्त्र परिधान करायला हवेत. त्यानंतर नवे वस्त्र परिधान केल्यानंतर मृतदेहाला चितेवर ठेवावे. मृतदेह चितेवर ठेवल्यानंतर फूल, चंदन तसेच पाच प्रकारची लाकडंही त्या चितेवर ठेवायला हवेत. तसेच चितेची परिक्रमाही करायला हवी.

मागे वळून का पाहू नये?

कुंटबातील किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर सगळे लोक स्मशानभूमीत जाऊन त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. अंत्यसंस्कार करताना मृत व्यक्तीची आत्मा त्याच भागात असते असे म्हटले जाते. अशा वेळी अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीने मागे वळून पाहिल्यास मृत व्यक्तीची आत्मा परत मृत्यूलोकात जाण्यासाठी प्रयत्न करते. मागे वळून पाहिलेल्या व्यक्तीसोबत जाण्यासाठी आत्मा प्रयत्न करते. त्यामुळेच अंत्यसंस्कार केल्यानंतर कधीही मागे वळून पाहू नये, असे म्हटले जाते.

मागे वळून पाहिल्यावर काय करावे?

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहिल्यास नकारात्मक शक्ती सोबत येऊ शकते. त्यामुळे अंत्यसंस्कार करून आल्यानंतर हात आणि पाय अग्निपासून थोडे दूर ठेवून ते शकले पाहिजेत, असे सांगितले जाते. त्यानंतर दगड, लोखंड किंवा पाण्याला स्पर्श करावा. त्यानंतर दगड किंवा पाणी पाठीमागे फेकून द्यावे. तसेच कडुलिंबाचे पान चावून ते थुंकून टाकावे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.