Kaudi Upay | देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवाळीला कवडीचे हे महाउपाय नक्की करा

| Updated on: Oct 20, 2021 | 12:30 PM

जीवनाशी संबंधित सर्व सुखांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते. ज्यासाठी माणूस दिवस-रात्र मेहनत करतो. दिवाळी हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता कुबेर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी लोक सुख आणि समृद्धीच्या इच्छेसाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधीवत पूजा करतात.

Kaudi Upay | देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवाळीला कवडीचे हे महाउपाय नक्की करा
Goddess Lakshmi Kaudi Upay
Follow us on

मुंबई : जीवनाशी संबंधित सर्व सुखांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते. ज्यासाठी माणूस दिवस-रात्र मेहनत करतो. दिवाळी हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता कुबेर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी लोक सुख आणि समृद्धीच्या इच्छेसाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विधीवत पूजा करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की देवी लक्ष्मीच्या पूजेत एक साधी मानली जाणारी गोष्ट तुमचे नशीब बदलू शकते.

जर तुम्ही आतापर्यंत दिवाळीच्या पूजेत कवडीशी संबंधित हा उत्तम उपाय केला नसेल, तर यावेळी नक्की करा. देवी महालक्ष्मी आणि कुबेर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग जाणून घेऊया.

? दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळ्या कवडी अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. कारण, ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत, या दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या पूजेत पिवळ्या कवडीचे अर्पण करायला विसरु नका. जर तुम्हाला सहज पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळत नसतील तर केशर किंवा हळदीच्या द्रव्यात पांढरे कवच भिजवून देवी लक्ष्मीला अर्पण करा. पूजेनंतर दुसऱ्या दिवशी त्या कवड्यांना लाल कपड्यात बांधून ठेवा आणि घरात जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा.

? दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अर्पण केल्यानंतर 11 कवड्या प्रसाद म्हणून घ्या. त्यांना लाल कपड्यात बांधून तुमच्या घराच्या मुख्य दारावर लटकवा. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करु शकणार नाही आणि घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहील.

? दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातील काही कवड्या तुमच्या पर्समध्ये ठेवा. पर्समध्ये या कवड्या ठेवल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांची आवक नेहमीच असेल आणि तुमची पर्स कधीही रिकामी राहणार नाही.

? जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे करिअर-व्यवसाय किंवा तुमची सुख-समृद्धीला नजर लागत असेल तर हे टाळण्यासाठी विशेषतः दिवाळीच्या रात्री, देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि त्याला प्रसाद म्हणून आपल्या गळ्यात घाला. हा उपाय केल्याने तुम्ही नेहमी डोळ्यांच्या दोषांपासून दूर राहाल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diya Remedies | पूजेच्या दिव्याने दूर होतील सर्व दु:ख, पूर्ण होतील सर्व इच्छा, हे उपाय करा

Tilak Remedies : ईश्वराचा प्रसाद आहे टिळा, जाणून घ्या कुणी कोणत्या प्रकारचा टिळा लावावा