
New Year Welcome 2026 : अवघ्या काही तासांनी आता नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. 2025 साल सरले असून आता सगळेच 2026 सालाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. हे नवे वर्ष चांगले जावे यासाठी अनेकजण वेगवेगळे पूजापाठ करतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही पूजा केली जाते. दरम्यान, या वर्षी मात्र नवे वर्ष सुखात आणि समाधानात जावे यासाठी 2025 सालाचा 31 डिसेंबर हा दिवस फारच महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी काही पूजा केल्यास तुमचे नवे वर्ष फारच आनंदी आणि सुखात जाणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी नेमके काय करावे? हे जाणून घेऊ या….
31 डिसेंबर रोजीच्या रात्री काही विधी करणे फार गरजेचे आहे. हे विधी केल्यावर तुमचे नवे वर्ष हर्षोल्हासात जाऊ शकते. 31 डिसेंबर हा पौष पुत्रदा एकादशीचा दिवस आहे. एकादशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी काही खास उपाय करावे लागतात. 31 डिसेंबरच्या रात्री जागरण करावे. सोबतच जागरण करताना भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी जी व्यक्ती श्रीहरीची पूजा करतो त्याच्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न असते. पौष पुत्रदा एकदशी च्या रात्री पूजेच्या स्थळी तांदळाचा ढीग तयार करा. त्यानंतर दिवा चालू करून श्रीसुक्ताचा जप करावा. त्यानंतर 1 जानेवारी रोजी प्रसाद म्हणून भाताचे दान करावे. हा उपाय केल्याने काही कार्यांना गती मिळते, असे सांगितले जात. सोबतच व्यवसायात प्रगती होते, असेही म्हटले जाते.
एखाद्या व्यक्तीला धनप्राप्तीमध्ये अडथळा येत असेल तर त्या व्यक्तीने 2025 वर्षाच्या रात्री एक मातीचे भांडे घ्यावे. त्या भांड्यात गहू भरावा. त्यानंतर हे मातीचे भांडे देवघरातील मंदिरात घेऊन जावे. थोड्या वेळानंतर हेच गहू गरजू व्यक्तीला दान करावे. असे केल्यास धनसंपत्तीत अडथळा ठरणारे विघ्न दूर होऊ शकते, असे सांगितले जाते.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.